वाडी अदमपूर येथे मरी माता यात्रेला लोकप्रिय आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांची भेट
अनिल डाहेलकर / नवप्रहार प्रतिनिधी
ग्राम वाडी अदमपूर येथे 20 ऑगस्ट 2024 मंगळवार रोजी श्रावण मास मधील मरी माता यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या यात्रेला अकोट मतदार संघाचे लोकप्रिय आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांच्या हस्ते मरी माताची व भक्तांचे पूजन करण्यात आले या यात्रेमध्ये मरी माता च्या मुखाचे पूजन करून संपूर्ण गावांमधून मरी माता चे भक्त मरी मातेचे बैलगाडे ओढून पूर्ण गावाला प्रदक्षिणा करण्यात येते या दिवशी गावामध्ये प्रत्येक घरामध्ये मरी मातेचा प्रसाद हा घराच्या अंगणामध्ये करण्यात येतो या यात्रेला पंचकोशीतील लोकांची व गावातील लेकी बाई व नातेवाईकांची प्रचंड उपस्थिती असते सर्व गावकऱ्यांच्या साथीने मरि माता उत्सव वाडी अदमपूर येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो या यात्रेला संपन्न करण्यासाठी गावातील सर्व समाजातील लोकांचे मोलाचे योगदान मरी माता संस्थांन लाभले