मराठ्यांचे ओबीसीकरण थांबवा.
ओबीसींच्या महामोर्चा जिल्हाधिकारी यांना दिलेले निवेदन.
यवतमाळ –ओबीसींच्या विविध मागण्यांकरिता व आरक्षणात होत असलेल्या घुस्करी संदर्भात ओबीसी च्या वतीने यवतमाळमध्ये महामोर्चा चे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात प्रमुख मागणी मराठ्यांचे ओबीसीकरण थांबवावे आणि मराठ्यांना शासनाने वेगळ्या पद्धतीने स्वतंत्र आरक्षण द्यावे. ओबीसी चे सर्रास प्रमाणपत्र वाटून ओबीसी समाजावर एक प्रकारे अन्याय केला जात असल्याचे यावेळी खंत आयोजकांच्या वतीने करण्यात आली ओबीसी मध्ये अनेक जातींचा समावेश झाला असून हे आरक्षण ओबीसीतील समाजांनाच पुरत नसल्याने यामध्ये आणखी मराठ्यांना सहभाग देऊन आरक्षणाचा कुठलाही लाभ ओबीसीतील तमाम जातीला होणार नाही अशी प्रतिक्रिया निवेदनामध्ये ऍडव्होकेट राजेंद्र मांडोळे यांनी केली आज शहरातील प्रमुख ठिकाणावरून या महामोर्चा रॅली महात्मा फुले पुतळा ते संविधान चौक,एलआयसी चौक त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरती येऊन थांबला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दुबे यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आजच्या मोर्चामध्ये हजारो ओबीसी समाज बांधवांनी आपली उपस्थिती आझाद मैदान परिसरात दर्शविली. या महामोर्चा मध्ये अनेक घोषणाबाजी करण्यात आली जो ओबीसी की बात करेगा वही देश के राज करेगा या घोषणामुळे सारा परिसर म्हणून गेला होता या निवेदनामध्ये १५ पेक्षा अधिक मागण्या ओबीसीच्या वतीने करण्यात आल्या होत्या यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, नानाभाऊ गाडबैले व अनेक मान्यवरांची यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना म्हणाले की मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात आमचा कुठलाही विरोध नाही मात्र ओबीसीतून आरक्षण देऊ नये शासनाने वेगवेगळ्या पद्धतीने आरक्षण द्यावे तो निर्णय शासनाने कोणत्या पद्धतीने घ्यायचा तो त्यांनी ठरवावा.
या मोर्चाचे नेतृत्व प्रदीप वादाफळे, एड.राजेंद्र महाडोळे, सतीश भोयर शैलेश गुल्हाने नरेंद्र गद्रे प्राध्यापक प्रकाश फेंडर, साहेबराव जुनघरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते
यावेळी हजाराच्या संख्येने ओबासी समाज बांधवांनी सुद्धा आपली उपस्थिती दाखविली.