मराठी भाषा जगाच्या अंगणात खेळण्यासाठी साहित्यीकांचे योगदान महत्वपूर्ण – साहित्यीका डॉ.लिलाताई गोविलकर
अ.नगर जिल्हा वाचनालय आणि नवयुग चॅरीटेबल ट्रस्टच्या परिसंवादात साहित्यीकांचा आनदोत्सव
नगर – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आज जाहिर झाला असला तरी संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतून नामदेवाच्या असंगातुन मराठी भाषेने गेली अनेक वर्षात जगभरात आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. अभिजात मराठी भाषेला मिळालेल्या या बहुमानानंतर मराठी भाषा जगभरातील असंख्य देशातील अंगणात खेळली पाहिजे. यासाठी अनुवादाच्या व तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन मराठी साहित्यीकांचे योगदान महत्वपुर्ण असेल असा आशावाद मराठी सहित्यांच्या जेष्ठ अभ्यासिका व साहित्यीका डॉ.लिलाताई गोविलकर यांनी व्यक्त केला.
अ.नगर जिल्हा वाचनालय व नवयुग चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने अभिजात मराठी भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर साहित्यीक, वाचक यांच्या माध्यमातून वर्षभर राबविण्यात येणार्या उपक्रमा विषयी तसेच आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आयोजित परिसंवाद प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, कार्यक्रमाचे प्रवर्तक नवयुग चॅरीटेबल ट्रस्टचे प्रमुख संजय पारनाईक, पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्या व आदिवासी साहित्याच्या अभ्यासिका डॉ.माहेश्वरी गावित, वाचनालयाच्या उपाध्यक्ष दिलीप पांढरे, प्रा.ज्योती कुलकर्णी, शिल्पा रसाळ, मसपाचे अध्यक्ष किशोर मरकड, कवी चंद्रकांत पालवे,आदींसह असंख्य क्षेत्रातील साहित्यीक उपस्थित होते.
डॉ.गोविलकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतात मराठी भाषेच्या असंख्य पुस्तकांचे भारतातील अनेक भाषेत भाषांतर झाल्याने अनेक भाषेला मराठीने सामावुन घेतले. हाच आलेख चढता राहुन परंदेशातील भाषेमध्ये मराठी साहित्य अनुवादीत व्हावे, संत साहित्याचा वारसा जगभरात जावा .यातुन खर्या अर्थात आपली मराठी जगभरात आपला वेगळा ठसा उमटवून शकेल असा विश्वास डॉक्टर गोविलकर यानी व्यक्त केला.
प्राचार्य डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे यांनी कालीदासापासून मराठी माणुस शिल्लक असे पर्यंत मराठी हि वाढतच जाणार असल्याने भाषेविषयी अकराण भिती बाळगण्याचे कारण नाही. इंग्रजी शाळेचे महत्व वाढत असतांना मराठी प्रेमी साहित्यीक वाचक, वाचनालये यांनी तेथे जाऊन त्यांना कथा, कविता, स्पर्धा या माध्यमातुन मराठी वाचनाची गोडी उगवत्या पिढीला लावली तर मराठी ही उखाणे वृद्धीगंत होईल. यासाठी आपण मराठी प्रेमीनी जागल्याची भुमीका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्राचार्या डॉ.माहेश्वरी गावित यांनी आशयपुर्ण मनोगतात आपल्या मराठीत तीन हजार पेक्षा जास्त बोली भाषा आहेत. त्यांचे जतन करणे ही काळाची गरज आहे. मराठी भाषकांची संख्या साडेबारा कोटी आहे. व ती वाढतच जाणार असल्याने आपल्या भाषेचे महत्व वाढणार आहे. यातील मराठी साहित्याची गोडी उगवत्या पिढीमध्ये वाढण्यासाठी ते वाचते व लिहिते होण्याची सुरवात आहिल्यानगर पासून व्हावी. शाळा महाविद्यालयात कथा, कविता, यासारख्या असंख्य साहित्य प्रकाराची ओळख, ती वृद्धीगंत होण्यासाठीच्या मार्गदर्शन कार्यशाळा, स्पर्धा अशा कृतीशिल उपक्रमाची चळचळ व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करुन सारडा महाविद्याल, अ.नगर जिल्हा वाचनालय, आणि नवयुग ट्रस्टच्या माध्यमातून याची सुरवात लगेचच करु या असे प्रतिपादन केले.
प्रास्ताविकात अ.नगर जिल्हा वाचनालयाचे प्रा.शिरिष मोडक यांनी अभिजात मराठी भाषेचा दर्जा ही आनंदायी गोष्ट असून याच माध्यमातुन सुमारे पावने दोनशे वर्ष जिल्हा वाचनालय यासाठी अविरत वाचन संस्कृती चळवळ चालविते आहे. आज नवयुगच्या पुढाकारातुन सुरु होणारी साहित्य विश्वातील क्रांतीकारी चळवळ मराठी भाषेला, साहित्यीक व साहित्य यांना लोकाभिमुख दर्जा प्राप्त करुन देतील असा आशावाद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे संयोजक उद्योजक व नवयुक ट्रस्टेच प्रमुख संजय पारनाइक यांनी उपस्थित साहित्यीकांचे स्वागत करुन मराठी भाषा, साहित्य हे उगवत्या पिढी पर्यंत घेवुन जाण्यासाठी पुढील वर्षभर व्यापक उपक्रम घेण्यासाठी येणार आहे. आज त्याचा प्रारंभ व साहित्यीकांचे मार्गदर्शन यातुन याला क्रांतीकारी दिशा मिळेल असा आशावाद व्यक्त केला.
याप्रसंगी उद्योजक नवनाथ धुमाळ, डॉ.सुनिल कात्रे, संपादक ज्ञानेश्वर कुलकर्णी, ज्योती केसकर, शिल्पा रसाळ, प्रा.ज्योती कुलकर्णी, कवी चंद्रकांत पालवे, मसपा नगर जिल्हा अध्यक्ष किशोर मरकड, दशरथ खोसे, पक्षीमित्र डॉ.सुधाकर कुर्हाडे, डॉ.वर्षा किर्तने, कवी सुभद्रासुत आंधळे, शब्बीर शेख अहमद बिलाल, सौ. निर्मला मांडे, अरविंद ब्राम्हणे, डॉ.लक्ष्मीकांत येलवंडीकर यांनी आपल्या वैशिष्ट पुर्ण संकल्पणातुन ही चळवळ व्यापक होण्यासाठी मार्गदर्शन केले.
यावेळी उद्योजक राजीव गुजर, प्रा.विश्वास काळे, प्रा.आर.जी.कुलकर्णी, किशोर यत्ते, माधवी कुलकर्णी, सखाराम गोरे, ग्रंथपाल अमोल इथापे, सहा.ग्रंथपाल नितिन भारताल, सावेडी जिल्हा वाचनालयाच्या सौ.सारिका देव, संकेत फाटक, पौर्णिमा गायकवाड, साक्षी पद्मा, दिपाली कल्याणम आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन सौ.गौरी जोशी, शिल्पा रसाळ, स्वागत प्रा.मोडक, तर आभार ज्योती कुलकर्णी यांनी मानले.
———
-अ.नगर जिल्हा वाचनालय व नवयुग चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने आयेाजित साहित्यीक परिसंवाद प्रसंगी बोलतांना साहित्यीक डॉ.लिलाताई गोविलकर. समवेत लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे, अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, साहित्यीका प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावित नवयुग ट्रस्टचे संजय पारनाईक, ज्योती कुलकर्णी, शिल्पा रसाळ व मान्यवर आदी. (छाया: सुरेश मैड)