अपघाताने पुन्हा हादरले आर्वी शहर आर्वी ते तळेगाव या रोडवर कित्येक तरुण मुलांना गमावावा लागला जीव.

आर्वी शहराच्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमन वाढुन सुद्धा प्रशासन व राजकीय मंडळी निद्रा अवस्थेत
आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी :- वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यामध्ये आर्वी-तळेगाव रोड पाच वर्षांपूर्वीपासून रखडत असलेल्या रोडमुळे पुन्हा एका तरुणीला गमावा लागला जीव आर्वी येथील बस स्टॅन्ड समोरील आयसीआयसीआय बँकेसमोर MH32-AT 1049 क्रमांकाच्या दुचाकीने बस स्टॉप कडून येताना
कु.प्रियाक्षी रमण लायच्या रा. गणपती वार्ड आर्वी वय (17) ही रोडच्या डाव्या बाजूनी जात असताना तळेगाव रोड कडे कृषक इंग्लिश शाळेत लहान बहिणीचे आधार कार्ड पोहोचण्याकरिता जात असताना त्या परिसरातील रोड अतिशय खराब असल्यामुळे चालत्या AP16 TW-4455 क्रमांक ट्रकच्या समोरच्या चाकात आल्याने रोडची परिस्थिती पाहता एकीकडे खाही तर दुसरीकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाल्याने कु.प्रियाक्षीचा त्या ठिकाणी जागीच मृत्यू झाला
*या रोडवरील वारंवार अपघात होऊन सुद्धा प्रशासन व राजकीय नेते दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे*
मागील पाच वर्षापासून सुरू असलेल्या आर्वी-तळेगाव रोडच्या कामामुळे व रोडच्या दोन्ही बाजूला अतिक्रमणामुळे पुन्हा एका अपघाताचे कारण ठरले असून निर्लज्ज राजकीय नेते एसी मध्ये बसून आराम करत असणारे व सुस्त प्रशासनामुळे पुन्हा एका नाहक तरुणीला आपला जीव गमावा लागला असे आरोप संतप्त आर्वीकर नागरिक करीत आहे.
घटनेच्या वेळी हजारो लोकांनी ट्रकला घेराव घेऊन ट्रक चालकावर व रोड कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई करण्याची मागणी केली इथेच आम्हाला न्याय द्या अन्यथा आम्ही इथून उत्तरनिय तपासणी करिता नेऊ देणार नाही असे मुलीच्या आई वडिलांनी व नातेवाईकांनी तसेच नागरिकांनी हट्ट करून चक्काजाम करण्यात आला होता तसेच घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाटून समजसपनेने संतप्त आर्वीकर नागरिकांना सांभाळत सर्व सुरळीत करण्याचा प्रयत्न केला व उत्तरणीय तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे दाखल करण्यात आले तसेच सध्या आर्वी शहरामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांमध्ये रोष असून अतिक्रमण व आर्वी तळेगाव रोडचे काम धीमे गतीने सुरू असून त्या निषेधार्थ संपूर्ण एक दिवस कडे कोड मार्केट बंद करण्यात आले हाेते.
*आर्वी शहरांमध्ये मुख्य रस्त्यावर अतिक्रमण वाढण्याला दोषी कोण* ?
आर्वीच्या मुख्य रोडवर शिवाजी चौक ते गांधी चौक व शिवाजी चौक ते वर्धा रोड तसेच शिवाजी चौक ते पुलगाव रोडव शिवाजी चौक ते देऊरवाडा रोड व शिवाजी चौक ते अमरावती रोड मुख्य रोडवरील रस्त्याच्या दोन्ही साईडला अतिक्रमण वाढल्याने अतिक्रमण हटवण्याकरिता आर्वीकर नागरिकांची सतत मागणी असून सुद्धा प्रशासन व राजकीय नेते यांना सपोर्ट करून बढावा देत असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा हाेत आहे.