अवैध्यरित्या कत्तलीसाठी नेत असलेल्या गोवंश तस्कर पारवा पोलिसांच्या ताब्यात.
महाराष्ट्रतून तेलंगणात होत होती तस्करी.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
पारवा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती नूसार पारवा ते पिंपळखूटी जाणा-या रोडणे मंगी जवळ अवैध्यरित्या कत्तलीसाठी नेत असलेल्या गोवंश हे पिकप गाडी क्र.टि.एस.०१ युए ७६२८ या वाहनात कोंबून सकाळी १०.३० चे दरम्यान दोन इसम तेलंगणा आदिलाबाद येथे नेत असल्याची पक्की खबर पारवा पोलिसांना मिळाली त्या आधारावर पारव्यातील कर्तव्य दक्ष ठाणेदार लिंगाडे यांणी सापळा रचून सदर वाहनांची अडवणूक करून तपासणी केली असता ६ गोवंश जातीचे बैल ६७००० रू किंमत अंदाजे हे निर्दय पणे कोंबून कत्तलीस नेत असताना आढळली त्यावर कार्यवाही करून आरोपी मोहंमद अखिल मोहंमद सावर वय वर्ष २२,आरोपी क्र.२ मोहंमद अयर मोहंमद इक्बाल हूसेन वय ३२ रा शांतीनगर आदिलाबाद यांना ताब्यात घेऊन अ.क.४०३/२३ अंतर्गत गून्हे नोंदविण्यात आली सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक मा.पवन बन्सोड,अ.पो.अ.पियुष जगताप, रामेश्वर व्यंजने यांचे मार्गदर्शन खाली पारवा ठाणेदार प्रविण लिंगाडे,बालाजी ससाणे,पो.कॉ. राठोड व ईतर सहकारी यांनी पार पाडली.