क्राइम

महागड्या चारचाकी वाहनातून गोवंश तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

Spread the love

कोला / नवप्रहार मीडिया 

               गोवंश तस्करांनी गोवंश चोरीसाठी अलीकडे चारचाकी वाहनांचा उपयोग केला असल्याचे अनेक घटनांवरून समोर आले आहे. गोवंश तस्कर इनोव्हा , स्कार्पिओ सारखे वाहन गोवंश तस्करी साठी वापरत आहेत. यामागे कोणाला त्यांच्यावर शंका जाऊ नये हा हेतू असल्याचे समोर आले आहे. अश्याच महागड्या चारचाकी वाहनातन गोवंश तस्करी करणाऱ्या तस्करांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे मुसक्या आवळल्या आहेत.

अकोट फैल येथील रहिवासी शेख अदनान शेख युसुफ कुरेशी याच्या मालकीच्या वाहनातून (क्र. एम. एच ०४ जीडी ०२२६) त्याचे साथीदार मोहम्मद रोशन शेख मुसा रा. मच्छी मार्केट, युसुफ खान रहीम खान रा. पुरपिडीत कॉलनी अकोट फैल, मो. अबुजर मो. हनीफ कुरेशी रा. मोहम्मद जली रोड व शेख रेहान शेख रशीद रा. पिंजारी गल्ली या पाच जणांनी जिल्ह्याच्या विविध ठिकाणावरून गोवंशाच्या तस्करीचा मोठा धंदा सुरू केला होता.

या टोळीने मूर्तीजापूर, अकोट, उरळ, सिव्हिल लाइन्स, आकोट फैल, डाबकी रोड व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गुरांची तस्करी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या टोळीला अटक केल्यावर चौकशी करण्यात आली. त्यामध्ये १३ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींडून एक चारचाकी वाहन, दोन महागड्या दुचाक्या, दोन महागडे मोबाइल असा एकून ११.८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आणखी एक चारचाकी वाहन लपविण्यात आले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या चोरट्यांना पुढील तपासासाठी सिव्हिल लाइन्स पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास भगत, पीएसआय गोपाल जाधव, गणेश पांडे, राजपालिसंह ठाकूर, दशरथ बोरकर, प्रमोद ढोरे, भास्कर धोत्रे, सुलतान पठान, रवि खंडारे, महेंद्र मलीये, अविनाश पाचपोर, विशाल मोरे, अमोल दिपके, राहूल गायकवाड, सुमीत राठोड, स्वप्नील चौधरी, प्रशांत कमलाकर, मो. नफीस यांनी केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close