क्राइम
अवैध दारू वाहुन नेणाऱ्यांच्या मंगरूळ पोलिसांनी आवळल्या मुसक्या
मंगरूळ दस्त. / प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातून दारूबंदी असलेल्या वर्षा जिल्ह्यात दारूची तस्करी होत असल्याने त्यावर आळा बसावा यासाठी जील्ह्यातील सर्व ठाण्यांना एसपी यांनी कारवाईचे आदेह दिले होते.
दि.१०/०५/२०२३ रोजी मंगरूळ दस्तगीर पोलीसांचे पथक नागपुर औरंगाबाद महामार्गावर गस्त करित असतांना अमरावती वर्धा सिमेवर स्विफ्ट गाडी क्रं. एम. एच. ३५ / पी ४५३२ ही संशयास्पदरित्या फिरत असतांना दिसुन आली. सदर गाडीला पोलीसांनी थांबविण्याचा प्रयत्न गाडी चालकाने गाडी जोरात पळवुन रॉयल बार, विटाळा चे बाजुचे अंधारात तपवुन ठवेली होती. पोलीसांनी सदर गाडीचा शोध घेतला असता सदर गाडी मिळुन आली तसेच सदर गाडी मध्ये व बाहेर गवतात लपवुन ठेवलेली ३५ पेटी देशी दारू (९० मी.ली. प्रती पावटी प्रमाणे ३५०० नग), १ पेटी देशी दारू (१८० मी.ली. प्रती पावटी प्रमाणे ४८ नग) तसेच ३ पेटी विदेशी दारू (१८० मी.ली. प्रती प्रमाणे १३० नग ) असा असा एकुण ६,९९, ३०० /- रूचा माल मिळुन आला. सदर गाडीमधील इसमांचा शोध घेतला असता ते परिसरातच गवतात अंधाराचा फायदा घेवुन लपुन बसलेले मिळुन आले.
मंगरूळ पोलिसांनी आरोपीप्रफुल्ल मनोहरराव ठाकरे,वय ३३, रा. सोनोरा, जि. वर्धा ,आसिफ इब्राहीम खान, वय ३९, रा. नाचणगांव, जि. वर्धा, मयुर भगवंतराव थुल, वय ३४, रा. पिंपरी मेघे, जि. वर्धा यांना दारूच्या पेटीसह अटक केली.
नमुद ०३ आरोपीतां विरूध्द पो.स्टे. मंगरूळ द. येथे मुंबई दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली असुन पुढील तपास मंगरूळ द. पोलीस करित आहे. सदरची कार्यवाही मा. श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. श्री. शशिकांत सातव, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. श्री. जितेन्द्र जाधव, उप विभागीय पोलीस अधिकारी, चांदुर रेल्वे यांचे मार्गदर्शनात श्री.सुरज तेलगोटे,ठाणेदार पो.स्टे. मंगरूळ द. पोलीस अमंलदार अवधुत शेलोकार, निशांत शेन्डे, सुनील उडाके, अमोल ” जिवन लांडगे, रमेश हलामी यांचे पथकाने केली आहे. हवराळे,
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1