विशेष

मानल रे पठ्ठ्या …….. बैलाला बाईक ची राईड घडवून आणत होता तरुण 

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया 

                  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर रोज नवनवीन व्हिडीओ पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ तर डोळे फिस्फरणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ऐक तरुण कुत्रा, मांजर नव्हे तर चक्क बैलाला दुचाकीवर बसवून फिरवताना दिसत आहे. हा आगळावेगळा व्हिडिओ अनेक लोकांनी बघितला असून त्यावर मजेशीर कॉमेंट्स देखील दिल्या आहेत.

सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय ज्यामध्ये एक व्यक्ती बैलाला दुचाकीवरुन घेऊन जात आहे. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होतोय.

दुचाकीवर बैलाला घेऊन जाताना एका व्यक्तीचा व्हिडीओ समोर आलाय. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. कारण एवढा मोठा बैल दुचाकीवर मावणार कसा? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यावर तु्म्ही चकित झाल्याशिवाय राहणार नाही.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती आपल्या बाईकवर बैलावर स्वार होताना दिसत आहे. एवढी अनोखी राइड तुम्ही याआधी कधीच पाहिली नसेल. व्यक्तीने एका बैलाला बाईकवर कसे बसवले आहे तुम्ही पाहू शकता. तो स्वतः मागे बसून बाइक चालवत आहे. मोठी शिंगे असलेला बैलही मोठ्या आनंदाने दुचाकीनर समोर बसला आहे. हे असं दृश्य दुर्मिळच पहायला मिळतं. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीनं हे दृश्य टिपलं आहे.

 

 

 

@nareshbahrain नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 12 सेकंदांचा हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असून भरपूर कमेंटही येत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक आश्चर्यकारक, धक्कादायक, मजेशीर, भावुक असे व्हिडीओ समोर येत असतात. कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल आणि चर्चेत येईल सांगू शकत नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close