डोळे येण्याचा साथरोगाचा औषध साठा तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करुन द्या
युवासेना युवती विधानसभाप्रमुख सौ प्रांजली कैलास कुलट यांची साथरोग अधिकारी जि.प.अमरावती यांनामागणी
अमरावती — प्रतीनिधी—
जिल्हात सध्या सर्वत्र डोळे येण्याची साथ सुरु आहे. गेल्या काही दिवसामध्ये
वातावरण बदलांमुळे सदी,खोकल्यांचे प्रमाण वाढले असतानाच आता डोळे येण्याच्या
साथीमुळे दर्यापुर-अंजनगाव सुजी तालुक्यातील नागरीक,विदयार्थी हैरान आहेत. डोळे येणे हा आजार संसर्गजन्य आजार आहे. एकापासुन तो दुस-या व्यक्तीला जडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे गेल्या आठवडयापासुन या साथीचे प्रमाण हे वाढले आहे. आपल्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या साथरोगाचा औषधाचा साठी कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे नागरीकांना खाजगी दवाखाण्यात औषधोपचार करावा लागत
आहे.करीता आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य तो औषधोपचार साठी औषध साठा
उपलब्ध करुन देण्यात यावा तसेच या आजाचाचे प्रमाण कमी करण्यासंदर्भात योग्य त्या
उपाययोजना करावा. ग्रामीण भागातील सर्व गावामध्ये आपल्या प्राथमिक आरोग्य
केंद्रामार्फेत या आजाराबाबत योग्य काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करावे जेणेकरुन या
साथ रोगाला आळा घालता येईल. अशाप्रकारचे निवेदन साथरोग अधिकारी जि.प.अमरावती डाँ मनीषा सुर्यवंशी यांना युवासेना युवती विधानसभा प्रमुख सौ प्रांजली कैलास कुलट यांनी देवुन मागणी केली आहे.