विदेश

पाकिस्तान मध्ये रेल्वेचा मोठा अपघात , अनेक जखमी तर अनेकांचा मृत्यू झाल्याची शंका 

Spread the love

शहजादपूर ( पाकिस्तान ) / नवप्रहार मीडिया 

          शेजारी असलेल्या पाकिस्तान मधून एक धडकी भरवणारी  बातमी येत आहे. येथे शहजादपूर आणि नबाबशहा दरम्यान सहारा रेल्वे स्थानका जवळ हजारा एक्सप्रेस च्या 10 बोग्या उलटल्याने 50 हुन अधिक हळजन जखमी झाले आहेत तर अनेक लोकं मृत्युमुखी पडल्याची शंका वर्तविण्यात येत आहे. ही गाडी कराची येथून रावळपिंडी ला जात होती. 

पाकिस्तानमधे आज एक मोठा रेल्वे अपघात  झाल्याची बातमी समोर आली आहे. शहजादपूर आणि नवाबशाह दरम्यान सहारा रेल्वे स्थानकाजवळ रावळपिंडीहून जाणाऱ्या हजारा एक्स्प्रेसचे 10 डबे उलटले. या अपघातात किमान 50 लोक जखमी झाले. बचाव कार्यादरम्यान 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बचावकार्य सुरू आहे. ही रेल्वे कराचीहून पंजाबकडे जात असताना अपघात झाला.

            पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कराचीहून रावळपिंडीला जात असताना हजारा एक्स्प्रेस रविवारी शहजादपूर आणि नवाबशाह दरम्यान रुळावरून घसरली, संघारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 50 जण जखमी झाले आहेत.

अपघातात जखमी झालेल्यांवर नवाबशहा येथील पीपल्स मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघात कशामुळे घटला याचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. रेल्वेचे विभागीय अधीक्षक महमुदूर रहमान म्हणाले की, संपूर्ण तपशील आल्यावर घटनेच कारण सांगता येईल

             स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर जवळच्या रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थिती लागू करण्यात आली आहे. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी सध्या बचावकार्य सुरू आहे. मदतकार्य करण्यासाठी लोको शेड रोहरी येथून एक ट्रेन घटनास्थळी पोहोचत आहे. अपघातामुळे अप ट्रॅकवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close