आध्यात्मिक

माझा गणेशोत्सव माझा मताधिकार.देखावा सजावट स्पर्धेचे आयोजन

Spread the love

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी व्हावे…. रुणय जक्कुलवार तहसीलदार

अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदाही अंजनगाव तहसील निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच वैयक्तिकरीत्याही नागरिकांना या स्पर्धेत सहभागी व्हावे. पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून मंडळांना देखाव्यांच्या माध्यमातून, तर घरगुती पातळीवर गणेश- सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांत यासंबंधी जागरुकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवावी. तसेच जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यासारख्या विषयांवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आपल्या देखावे व सजावटीतून जागृती करुन लोकशाही समृद्ध करता येईल त्यामुळे जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी उत्कृत स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन तहसीलदार रुणय जक्कुलवार निवडणूक नायब तहसीलदार अविनाश पोटदुखे यांनी केले आहे

*सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बक्षिसांचे स्वरूप*

अ)प्रथम क्रमांक – एक लाख रुपये
ब) व्दितीय क्रमांक – एकावन्न हजार रुपये
क) तृतीय क्रमांक – एकवीस हजार रुपये
ड) उत्तेजनार्थ – दहा हजार रुपयांची दहा बक्षीसे

*नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे*

या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत मतदार ओळखपत्राला आधार कार्डाची जोडणी, मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलांतील दुरुस्त्या, नवीन सुधारणान्वये मतदार नोंदणीसाठी लागू झालेल्या चार अर्हता तारखा यासाठी प्रसार-प्रचार करावा, जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे.

रुणय जक्कुलवार
तहसीलदार

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close