मैत्रिणींच्या मदतीने तो हिंदू मुलींना फासायचा ; मग त्यांच्यावर करायचा लैंगिक अत्याचार

तरुणींना टॉर्चर केल्या जात असल्याचे व्हिडिओ
व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत करायचा ब्लॅकमेल
भोपाळ / नवप्रहार ब्युरो
मध्यप्रदेश ची राजधानी भोपाळ मधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एका धर्मांध युवकाकडून मैत्रिणीच्या मदतीने डझनभर च्या वर मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे त्यानंतर त्यांचे लैंगिक शोषण करायचे. त्याचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करायचे. हा प्रकार भोपाळ मध्येच नाही तर इंदूर.मध्ये देखील घडला असल्याचे तपासात समोर आले आहे.
दोन सख्ख्या बहिणींनी तक्रार केल्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला. दरम्यान आरोपींच्या क्रूरतेचा व्हिडीओ समोर आला असून तो पाहिल्यानंतर पोलीसही हादरले आहेत. आरोपींना यामध्ये दोन तरुणीही साथ देत होत्या. ज्या मुलींचं ब्रेनवॉशिंग करायच्या. या तरुणी एखाद्या एजंटप्रमाणे काम करत होत्या. मुलींना जाळ्यात ओढून त्यांना मोठी स्वप्नं दाखवणं हे त्यांचं काम होतं. ते पूर्ण कऱण्यासाठी आरोपींशी मैत्री करणं गरजेचं आहे असं त्या भासवत होत्या. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
भोपाळमध्ये बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात बळी पडलेल्या दोन सख्ख्या बहिणींच्या तक्रारीनंतर, आरोपींच्या क्रूरतेचे व्हिडिओही समोर आले आहेत. हे पाहून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली आहे. एका व्हिडिओमध्ये, मास्टरमाइंड आरोपी तीन मुलींवर एकत्रित बलात्कार करताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, मुलीला सिगारेटने चटके देत असल्याचं दिसत आहे. इंदूरमध्येही या टोळीने केलेले गुन्हे समोर आले आहेत.
भोपाळच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीने आपण कशाप्रकारे आरोपीच्या जाळ्यात अडकलो हे सांगितं आहे. तिच्या एका मैत्रिणीने आरोपीशी मैत्री करुन दिली होती. यानंतर त्याने एक एक तर दोन्ही बहिणींना जाळ्यात ओढलं आणि लैंगिक अत्याचार करतानाचे व्हिडीओ शेअर केले. यानंतर त्याने इतका त्रास दिला की, अखेर त्यांना कॉलेज सोडावं लागलं.
विरोध केल्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
मोठ्या बहिणीने सांगितलं की, आरोपीने आधी मैत्री करुन नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. यानंतर त्याने बलात्कार केला. जेव्हा लग्नाची विचारणा करण्यात आली तेव्हा त्याने धर्मांतर करण्यास सांगितलं. विरोध केल्यानंतर लैंगिक अत्याचाराच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तिच्या छोट्या बहिणीलाही अशाच प्रकारे फसवण्यात आलं.
इंदूर पोलिसांना पत्र
आरोपी मुलींना निर्घृण मारहाण करायचे. तसंच याचे व्हिडिओही बनवायचे आणि मोबाईलमध्ये सेव्ह करायचे. विद्यार्थ्यावर क्रूर अत्याचार केल्याचा व्हिडिओ देखील सापडला आहे. डीसीपी संजय अग्रवाल यांनी इंदूर पोलिसांना एक पत्र पाठवलं असल्याचं सांगितलं आहे.
एकाच वेळी तीन मुलींवर बलात्कार
टोळीचा प्रमुख फरहान याच्या मोबाईल फोनवरून पोलिसांना त्याचे क्रूर कृत्य दाखवणारे व्हिडिओ सापडले आहेत. एका व्हिडिओमध्ये तो तीन मुलींवर एकत्र बलात्कार करताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये पीडितेला सिगारेटने जाळताना दिसत आहे.
या टोळीच्या जाळ्यात एक डझनहून अधिक मुली अडकल्याचा पोलिसांना संशय आहे. यामधील एक मुलगी अल्पवयीन आहे. पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलमधून डझनभरापेक्षा जास्त अश्लील व्हिडीओ मिळाले आहेत. पोलिसांनी डिलीट केलेले व्हिडीओही रिकव्हर केले आहेत. पोलीस व्हिडीओत दिसणाऱ्या तरुणींची ओळख पटवत आहेत.
आरोपी मोबाईलमधील व्हिडीओ कुठे शेअर करायचा याची माहिती पोलीस मिळवत आहेत. आरोपीने पॉर्न इंडस्ट्रीला हे व्हिडीओ पाठवले तर नाहीत ना याचा पोलिसांना संशय आहे. यासाठी त्याच्या बँक खात्याची छाननी केली जात आहे.