सामाजिक

रेल्वे प्रवाश्यांसाठी दिलासादायक बातमी , काही एक्सप्रेस गाड्यांसाठी आकारले जाणार पॅसेंजर  चे दर

Spread the love

वर्धा  / नवप्रहार मीडिया

                 कोरोना काळात अनेक गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. पण जनजीवन सुरळीत झाल्यावर काही गाड्या सुरू करण्यात आल्या. परंतु त्याचे प्रवाशी भाडे आणि थांब्याला घेऊन जनतेत नाराजी पसरली. मेमु गाडीला एक्सप्रेस चे दर आकारल्या जाऊ लागले. तर काही गाड्यांचा थांबा कमी करम्यात आला. त्यामुळे जनता आक्रोशीत झाली.आणि त्यांनी लोकप्रतिनिधींकडे तक्रारी सुरू केल्या. त्यांच्या तक्रारीला न्याय देत काही एक्सप्रेस गाड्यांच्या प्रवाशी भाड्यात घट करण्यात आल्याचे संकेत मिळाले आहेत.

भुसावळ-नागपूर तसेच अजनी-अमरावती-अजनी या दोन इंटरसिटी एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मेमु’ ट्रेन आहेत. त्यांना एक्सप्रेस गाड्याचे दर आकारल्या जात होते. आता या गाड्यांच्या तिकिटासाठी पॅसेंजर गाड्यांचे प्रवासभाडे आकारल्या जाणार आहे. कोवीडनंतर अनेक गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. पॅसेंजर गाड्या अद्याप बंदच आहे. या पार्श्वभूमीवर दर कमी करण्याचा निर्णय झाल्याची माहिती खासदार रामदास तडस यांच्या कार्यालयाने दिली.

तुळजापूर रेल्वे स्थानक येथे अनेक गाड्यांचा थांबा बंद करण्यात आला होता. त्यासाठी परिसरातील २२ गावांच्या नागरिकांनी लढा उभारला. वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन झाले. अखेर इंटरसिटीचा थांबा घेवूनच गावात येईल, अशी हमी तडस यांनी गावकऱ्यांना दिली होती. तुळजापूर रेल्वे स्थानकात म्हणजे दहेगाव गोसावी येथे अजनी-अमरावती-अजनी या इंटरसिटी मेमु एक्सप्रेसने थांबा घेतला. त्यावेळी नागरिकांनी जल्लोष करून स्वागत केले. तडस यांनी वर्धा ते तुळजापूर असा रेल्वेने प्रवास केला. याच वेळी मेमु गाड्यांना पॅसेंजरचे दर लागू होणार असल्याची माहिती देण्यात आली. यामुळे जनतेला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गावाचे सरपंच, रेल रोको कृती समितीचे पदाधिकारी, रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. यापूर्वी वर्धा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या चांदूर रेल्वे स्थानकावर जबलपूर व शालिमार एक्सप्रेसचा थांबा मिळावा म्हणून मोठे आंदोलन झाले होते. त्याचा पाठपुरावा केल्यानंतर गुरूवारपासून जबलपूर चा थांबा  पूर्ववत झाला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close