सामाजिक

पार्डी एकबुजी येथे समता सैनिक दलाची स्थापना व शाखेचे उद्घाटन

Spread the love

 

बुद्ध उपासक उपासिका यांचा मोठा सहभाग

वाशिम ; येथून जवळच असलेल्या ग्राम पार्डी एकबुर्जी येथे समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्कर अर्पण करून व पूजन करून धम्मा ध्वजाचे ध्वजारन माजी भारतीय सैनिक संदीप अंभोरे, जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन सामाजिक कार्यकर्ते प्रदिप पट्टेबहदुर, शिक्षक सुरज पडघान,दत्ता सरकटे,समता सैनिक दलाच्या जिल्हाध्यक्षा गावंशाखा अध्यक्षा सुनिता सरकटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गावातील बौद्ध उपासक तथा उपासीका यांचा मोठा सहभाग या कार्यक्रमाला लाभला असून. आज दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी समता सैनिक दल शाखेच्या फलकाचे अनावरण समता सैनिक दल तालुका अध्यक्ष लक्ष्मी राजे, शाखा संघटक माया सरकटे,सयोगीनी सीमा पटेदार, गावं शाखा आध्यक्षा सुनिता सरकटे ,निबाजी सरकटे, वसंता सरकटे,दत्ता सरकटे,धनंजय सरकटे,लक्ष्मण सरकटे,मधुकर सरकटे,स्वागत सरकटे,पवन सरकटे, सुनिल सरकटे,विशाल सरकटे, प्रदिप जाधव,सुमेध सरकटे,अध्यक्षा सुनिता सरकटे, सचिन,शिला सरकटे कोषाध्यक्ष विमल सरकटे, इतर पदाधिकारी सैनिक महिला व गावातील ज्येष्ठ नागरिक बौद्ध उपासक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या मार्गदर्शनातून सांगण्यात आले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 24 सप्टेंबर 1924 मध्ये समता सैनिक दलाची स्थापना केली होती. समाजाचा उद्धार व अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याकरिता समता सैनिक दलाच्या माध्यमातून यांनी फेडरेशन संघटन तयार करून कार्य केले पाहिजे. समाजाचे संरक्षण समता सैनिक माध्यमातून व्हावे याकरिता. स्थापना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. २४ सप्टेंबर इ.स. १९२४ साली बाबासाहेबांनी महाडला एक परिषद भरविली होती. महाडच्या सत्याग्रहा पूर्वीची ही परिषद होती. या परिषदेत समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली. इ.स. १९२७ चा काळ पाहता चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि मनुस्मृतीचे दहन या महत्त्वाच्या घटना आहेत. समाजात अस्पृश्यावर अन्याय, अत्याचार समाजाचे संरक्षण व्हावे. एकदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळीचे ही समता सैनिक दल संघटन स्थापन केले. अशी महिती यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमाचा उपस्थित ग्राम.वेळेगाव शाखा अध्यक्ष उज्वला इंगोले,सचिव शीला पट्टेबहादूर,कोषाध्यक्ष अनिता हिवराळे ग्राम.जुमडा समता सैनिक दल शाखेच्या रेखा पडघान,वर्षा पडघान,वंदना सावळे,ग्राम.भटउमारा समता सैनिकल शाखेच्या पुष्पा रोकडे ललिता रोकडे,कांता रोकडे,अध्यक्ष शशिकला सरकटे,कोषाध्यक्ष सुनीता सरकटे,सहसचिव वंदना सरकटे सैनिक वैशाली सरकटे यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता शोभा सरकटे, त्रिगुना सावळे,गुंफा सरकटे,अलका सरकटे,वनिता सावळे,अंतकाळ सरकते,मंकरणा सरकटे, संगिता सरकटे,सिंधू सरकटे,सुष्मा सरकटे, यमुना पडघान,प्रतिक्षा सरकटे, संगिता सावळे,सूनिता भिसे,वर्षा सरकटे,संगीता सरकटे,राधा सरकटे, अलका सरकटे,माया सरकटे, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माया सरकटे यांनी केले तर सर्वांचे आभार समता सैनिक दल सर्व सैनिक एकबूर्जी यांनी मानले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close