सामाजिक

महावितरणचे ऊर्जा चॅट बॉट करणार वीजग्राहकांना मार्गदर्शन

Spread the love

 

घरबसल्या मिळणार सर्व माहिती: तक्रारही करता येणार

यवतमाळ / प्रतिनिधी

: वीजग्राहकांना गुणवत्तापूर्ण आणि अद्ययावत सुविधा देण्याचा प्रयत्न महावितरणकडून केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून वीज ग्राहकांना तक्रार निवारण, बिल भरणा, नवीन वीज जोडणी अशा विविध कामांसाठी मदत करणारे ऊर्जा चॅट बॉट ॲप्लिकेशन महावितरणने विकसीत केले आहे.

ग्राहकांना भरवशाचा, दर्जेदार आणि पुरेसा वीज पुरवठा या मूलमंत्रावर महावितरणचे कामकाज सुरू आहे. ग्राहकांना दर्जेदार आणि वेळेवर सेवा देण्यासाठी ऊर्जा चॅट बॉट उपयोगी ठरेल. ऊर्जा चॅट बॉटमुळे ग्राहकांना कार्यालयात येण्याची गरज राहणार नाही. दिवसाचे चोवीस तास आणि सप्ताहाचे सातही दिवस सेवा उपलब्ध असल्याने त्यांना सोईनुसार सेवेचा लाभ घेता येईल. या ॲप्लिकेशनमुळे वीजग्राहकांना सुविधा मिळणार आहेच शिवाय महावितरणलाही ग्राहकांच्या समस्या आणि अपेक्षा सहजपणे समजून घेता येणार आहेत. त्यामुळे या ॲपचा जिल्ह्यातील वीजग्राहकांनी वापर करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
———–
*काय आहे उर्जा चॅट बॉट:-*

आर्टीफीशीयल इंटेलीजंन्सवर आधारीत ‘ऊर्जा “हे चॅट बॉट महावितरणने विकसित केले आहे. महावितरणच्या संकेतस्ळावर ते उपलब्ध आहे. महावितरणशी संबंधित ग्राहकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी या चॅट बॉटमध्ये सुविधा आहे. ग्राहकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे चॅट बॉटद्वारे दिली जातात व त्यातून ग्राहकांना मार्गदर्शन होते. ग्राहकांना त्वरित प्रतिसाद तसेच जलद आणि कार्यक्षम सुविधा प्रदान करणे ही या चॅट बॉटची वैशिष्ट्ये आहेत.
—————-
*कसा कराल वापर?*

महावितरणच्या उर्जा चॅट बॉटचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम www.mahadiscom.in या महावितरणच्या संकेतस्थळाला भेट द्या. संकेतस्थळ उघडताच पहिल्या पानावर उजव्या बाजुला अगदी खालच्या भागात संगणक किंवा टीव्ही संचासारखे एक हलणारे कार्टून दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर उर्जा चॅट बॉट उघडेल. तसेच महावितरणच्या मोबाईल अपमध्ये सुध्दा चॅटबॉटची व्यवस्था आहे.त्यात इंग्रजी आणि मराठी भाषा निवडण्याचे पर्याय असतील. त्यातील पर्याय निवडून खाली तुम्हाला आवश्यक असलेली माहिती जाणून घेता येईल किंवा तक्रारही करता येईल.

आर्टीफिशियल इंटेलिजेंन्सवर आधारीत ऊर्जा चाट बॉट या अप्लिकेशनमुळे वीज ग्राहकांना नविन वीज जोडणी घेण्यापासून तर वीजविषयक तक्रारी,वीजबिल ऑनलाईन कुठे आणि कसे भरावे याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी महावितरणच्या ऊर्जा चाट बॉटचा वापर करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close