संकल्प फाउंडेशन रामपूर व गुरुदेव सेवा मंडळ रामपूर ची प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न.
– प्रश्नमंजुषा स्पर्धेला उत्सपूर्त प्रतिसाद.
– वं.राष्ट्र.तुकडोजी महाराज यांच्या जीवनचरित्र्यावर घेण्यात आली स्पर्धा.
राजुरा:- ( छबिलाल नाईक, प्रतिनिधी )
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या साहित्याचा, जीवनचरित्र्याचा अभ्यास व माहिती विषयक माहिती सर्व सामान्य माणसापर्यंत, पोहोचवावी या करिता नेहमी कार्यरत असणारी गुरुदेव सेवा मंडळ रामपूर, तसेच वाटचाल कुपोषण मुक्तीकडे या अभियाना मार्फत अनेक गावात कुपोषित मुलांना आहार किटचा वाटप करणारी संकल्प फाउंडेशन ही सामाजिक संस्था, या दोन्ही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ग्रामजयंतीचे औचित्य साधुन वंदनीय महाराजांच्या जीवन चरितत्र्यावर प्रश्नमंजुषा स्पर्धा रामपूर येथे घेण्यात आली. या स्पर्धसाठी दोन गट ठेवण्यात आले , प्रथम गट १०-१८ वय पर्यंत तर दुसरा गट १९ वर्षां समोरील या दोन्ही गटामधील युवक,युवती व रामपूर येथील नागरिकांनी भरघोस असा प्रतिसाद दिला. या परीक्षेला यशस्वी करण्याकरिता श्री गुरुदेव सेवा मंडळ रामपूर चे सेवाधिकारी देविदास मालेकर ,सचिव प्रकाश उरकुंडे, कोषाध्यक्ष प्रा.राजेंद्र मालेकर, युवा प्रमुख निखिल गिरी, गजानन घुगुल, अनिल चौधरी , परशुराम साळवे, संकल्प फाउंडेशन सल्लागार उज्वल शेंडे,संस्थापक अध्यक्ष तथा प्रचारक गुरुदेव सेवा मंडळ रामपूर सूरज गव्हाणे, उत्पल गोरे,दीपक झाडे,सचिन क्षीरसागर, तसेच इतर दोन्ही संस्थेचे सदस्य यांनी अथक परिश्रम घेऊन स्पर्धा यशस्वी केली.