सामाजिक

महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात

Spread the love

 

मोटर सायकल रॅली आणि चित्ररथ ठरला आकर्षण)

वीरशैव हितसंवर्धक मंडळ, वसुधा प्रतिष्ठाण, बसव क्लब, लिंगायत महिला मंडळ, यवतमाळ आयोजीत जगद्ज्योती
महात्मा बसवेश्वरांनी मंगळवेढा येथे “लोकशाही संसद म्हणजेच ‘अनुभव मंटपाची’ स्थापना केली. या अनुभव मंटपात सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणींवर कशी मात करावी यावर चर्चा करण्याचे कार्य चालत असे. बसवण्णांनी समाजातील रूढीपरंपरा, वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजाच्या हितकारक गोष्टींची अंमलबजावणी करणारी नवीन यंत्रणा तयार केली, बाराव्या शतकातील आदर्श प्रशासक समतेचे प्रणेते म्हणून महात्मा बसवेश्वरांना ओळखले जाते. सर्व प्रथम लोकशाही मूल्याची सुरूवातही म. बसवेश्वरांनी बाराव्या शतकातच अनूभव मंटपाच्या माध्यमातून केली आहे अश्या ह्या महामानवाच्या विचारांची ओळख समाजाला व्हावी या उद्देशाने मोठ्या उत्साहात महात्मा बसवेश्वर यांची ९१९ वा जयंती साजरी करण्यात आली. सकाळी महात्मा बसवेश्वर चौक येथून भव्य मोटर सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली. लिंगायत समाजातील बांधव आणि भगिनी विशिष्ट पेहरावामध्ये या मोटर सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते. ढोल नगाड्यासह शहराच्या विविध भागामध्ये फिरून ही रॅली महात्मा बसवेश्वर सांस्कृतिक भवन येथे विसर्जित झाली, महात्मा बसवेश्वर भवन येथे कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे पुजन करून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला, वीरशैव हितसंवर्धक मंडळाचे अध्यक्ष डॉ. जयेश हातगांवकर,व सर्व कार्यकारणी सदस्य व सर्व जेष्ठ समाज बांधव मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर सर्व समाजबांधव महात्मा बसवेश्वरांची जयंती शासन स्तरावर साजरी करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय येथे मार्गस्थ झाले. तसेच महात्मा बसवेश्वरांचे जयंती ला सायंकाळी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे श्री गुरू कैलासलिंग महाराज, तळेगाव आणि वीरशैव हितसंवर्धक मंडळाचे अध्यक्ष डॉ. जयेश हातगांवकर ह्यांचे हस्ते पुजन करून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेमध्ये शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते, शोभायात्रेमध्ये सर्वप्रथम वसुधा प्रतिष्ठानाचा महात्मा बसवेश्वरांचा अश्वधारी रथ हा त्यामध्ये कु.संस्कृती शेटे , जान्हवी शेटे ह्या चिमुकल्या बहिनीनीं अक्कमा देवी आणि राणी चन्नमा ह्यांचे पात्र साकारीत उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आकर्षणाच्या केन्द्र ठरल्या, तसेच कैलासलिंग महाराज अश्वरथामध्ये आसनस्थ होते, सोबतच शंकराची भव्य मुर्ती, भजनी मंडळ,बँड पथकासह,मार्गक्रमण करित होते शोभायात्रेला गणपती मंदिर येथून सुरवात झाली. विविध चौकांमध्ये शोभायात्रेचे समाजबांधवाच्या वतीने सुद्धा स्वागत करण्यात आले. मार्गामध्ये लहानुआप्पा आयुर्वेदिक चे मिलींद गाढवे, अनिल हमदापुरे, गजानन हमदापुरे, ईश्वरी बेन्टेक्स, व बीसी ग्रुप द्वारा ठिकठिकाणी बांधवासाठी थंड पेयाची व्यवस्था करण्यात आली, शोभायात्रा महात्मा बसवेश्वर चौकामध्ये आली असता चौकामध्ये शोभा यात्रेचे फटाक्यांच्या आतिषबाजीने आणि रथावर पुष्पवृष्टी करून उत्साहात स्वागत करण्यात आले. शोभायात्रा महात्मा गांधी चौक मार्गे महाविर भवन येथे आल्यानंतर ह्या प्रसंगी बोलतांना कैलास लिंग महाराज म्हणाले. जगातील पहिल्या लोकशाही संसदेचे जनक महात्मा बसवेश्वर हे आहेत. १२ व्या शतकात श्री पुरुष समानतेकरिता त्यांनी फार मोलाचे काम केले आहे. समाजातील जातीभेद, वर्णभेद नष्ट करण्याचे कठीण असे काम महात्मा बसवेश्वरांनी फार अगोदरच केले आहे. या शब्दांत त्यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरीता वीरशैव हितसंवर्धक मंडळ, बसुधा प्रतिष्ठान, बसव क्लब, लिंगायत महिला मंडळ, लिंगायत गवळी समाज, लिंगायत जंगम समाज, लिंगायत बुरड समाज, इत्यादी समाज बांधवांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close