शैक्षणिक

शिक्षकांच्या वेतन तृटी प्रस्तावाबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चे शालेय शिक्षण विभागाकडे निवेदन 

Spread the love
स्वप्नील कोळी,खुलताबाद 
शिक्षकांच्या वेतन तृटी प्रस्तावाबाबत ‘महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून’ शालेय शिक्षण विभागाच्या मा.प्रधान सचिव (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग)व मा.उप सचिव (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग)
महाराष्ट्र शासन,मुंबई यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात राज्याध्यक्ष विजय कोंबे व राज्य सरचिटणीस राजन कोरगांवकर यांनी म्हटले आहे की,
सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करताना राज्यातील प्राथमिक शिक्षक,पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या वेतनश्रेणीत सेवा कनिष्ठ शिक्षकांपेक्षा कमी वेतन निश्चिती झाली आहे. याबाबत वेतन त्रुटी दूर करण्याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ने सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला आहे.राज्य शासनाच्या वित्त विभागाने पत्र क्रमांक-वेपूर-११२४/प्र.क्र.१७/सेवा-९ दि. १६.०३.२०२४ नुसार वेतन त्रुटी निवारण समिती गठीत करून दि. १६ मे २०२४ पूर्वी वेतन त्रुटी निवारणाचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणी व पदवीधर वेतन श्रेणी त्रुटी बाबत परिपूर्ण असा वस्तुस्थितीदर्शक प्रस्ताव पुराव्यासह दि.४ एप्रिल २०२४ रोजी ग्राम विकास विभागाकडे समक्ष सादर केला. तसेच शालेय शिक्षण विभागाकडे सुद्धा दि. १० एप्रिल २०२४ रोजी मा.उपसचिव महोदयांकडे सादर केला आहे. ग्राम विकास विभागाने वेतन त्रुटी निवारण समितीकडे सदर प्रस्ताव आपल्या शिफारशीसह संदर्भित-२ नुसार दि. ६ मे २०२४ रोजी सादर केला आहे.
परंतु शालेय शिक्षण विभागाने विहित मुदतीत प्रस्ताव सादर केला नसल्याची आमची माहिती आहे. प्राथमिक शिक्षण संवर्गात येणारी सहाय्यक शिक्षक व पदवीधर प्राथमिक शिक्षक ही पदे शालेय शिक्षण विभागांतर्गत येतात. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाकडून वेतन त्रुटी निवारणाबाबत आवश्यक प्रस्ताव वस्तुस्थितीजन्य पुराव्यासह आणि यथायोग्य शिफारशीसह पाठविणे आवश्यक आहे अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती म्हणून आमची ठाम धारणा आहे. संदर्भित-१ नुसार वेतन त्रुटी निवारण समितीकडे प्रस्ताव पाठविण्यास ३१ मे २०२४ पर्यंत अंतिम मुदतवाढ वित्त विभागाने दिलेली आहे. त्यास अनुसरून सविनय विनंती करण्यात येते की- शालेय शिक्षण विभागाकडूनही आवश्यक प्रस्ताव महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आपल्या कार्यालयास सादर केलेल्या वस्तुस्थितीजन्य पुराव्यासह विहित वाढीव मुदत्तीत सादर करावे.अशी माहिती शिक्षक समितीचे मराठवाडा विभागीय प्रसिध्दीप्रमुख सतिष कोळी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.यावेळी राज्य प्रवक्ता नितीन नवले,विभागीय अध्यक्ष शाम राजपूत आदी उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close