जुनी पेन्शन मागणीच्या आमरण उपोषणास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा जाहीर पाठिंबा…..

वर्धा:- 1982 ची पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटने द्वारा वर्धा येथे दिनांक 2 ऑक्टोबर पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या 19 पेन्शन फायटर बांधवांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
*सदर उपोषणास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष मा. केशवराव जाधव यांनी दिनांक 2 ऑक्टोबरला एका पत्राद्वारे सक्रिय पाठिंबा जाहीर केला.*
सदर राज्य संघाचे पाठिंब्याचे पत्र वर्धा जिल्हा शिक्षक संघाचे सक्रिय पाठिंब्यासह आज दिनांक 3 ऑक्टोबर 2024 ला जुनी पेन्शन संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री. वितेश खांडेकर यांना शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष- श्री.लोमेश वऱ्हाडे, वर्धा जिल्हा अध्यक्ष- अरुण झोटिंग यांचे नेतृत्वात, वर्धा जिल्हा संघाचे पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
*यावेळी मा. लोमेश वऱ्हाडे यांनी मनोगत व्यक्त करून राज्य व जिल्हा शिक्षक संघाची भूमिका विशद करून जुनी पेन्शन मिळत पर्यंत राज्यात व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांचा सक्रिय पाठिंबा राहील अशी ग्वाही याप्रसंगी दिली.*
एक नोव्हेंबर 2005 पासून सेवेत आलेले सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित संस्थातील कर्मचारी, शिक्षकांना 1982 ची जुनी पेन्शन आणि 1984 ची भविष्य निर्वाह निधी योजना लागू होणे हा आपला हक्क आहे. 31 ऑक्टोबर 2005 च्या शासन निर्णयाने बंद झालेली जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्याची मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यासाठीचा अविरत संघर्ष न्याय सांगत आहे. अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची ठाम भूमिका आहे.
त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 2 ऑक्टोबर 2024 पासून वर्धा येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने आयोजित केलेल्या बेमुदत आमरण उपोषणाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा पाठिंबा जाहीर करण्यात आला.
यावेळी वर्धा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस- सुनील कोल्हे, उपाध्यक्ष- राजेश वालोकर, वर्धा तालुका अध्यक्ष- आशिष फरकाडे, देवळी तालुका अध्यक्ष- हनुमंत जगताप, निलेश चौधरी, गंगाधर कासेकर, तेजस देशमुख, गजानन पोटे, राजेंद्र इंगोले, भोजराज नगराळे, गणेश लाडेकर, अनिल पवार, उल्हास शेळके, रविकांत वहारे, अजय पवार, धर्मदास आढावू, रवींद्र ब्राह्मणे, तुकाराम दांडेकर, सुहास उईके, निवृत्ती पोटे, आदींची उपस्थिती होती.