मणिपूरमधील महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारचा मदतीचा हात
देवेंद्र फडणवीस यांचा विद्यार्थ्यांना फोन; काळजी करू नका!
– गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये परिस्थिती तणावाची
– महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी NIT मणिपूरमध्ये शिकायला. ते तणावात असल्याने राज्य सरकारने तातडीने पाऊले उचलली.
– स्थानिक तणावामुळे विद्यार्थी चिंतित
– या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस केला, देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना फोन करून, त्यांच्याशी चर्चा करून त्यांना आश्र्वस्त केले आणि सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
– महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनी मणिपूर पोलिस महासंचालक यांना संपर्क केला.
– देवेंद्र फडणवीस यांनीही तत्काळ मणिपूर सरकारशी संपर्क केला आणि या विद्यार्थ्यांना तत्काळ, परिस्थिती पूर्वपदावर येईस्तोवर त्यांना सुरक्षित वातावरणात ठेवण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांना येथे सुरक्षा मिळेल.
– शिवाय या विद्यार्थ्यांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्याची सुद्धा व्यवस्था महाराष्ट्र सरकारच्या वतीने तत्काळ केली जात आहे. महाराष्ट्र प्रशासन सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.