सामाजिक

खाजगीकरण – कंत्राटीकरण विरोधात महामोर्चा

Spread the love

सार्वभौम युवा मंच व विविध सामाजिक संघटनांचा पुढाकार

लाखनी – रोशन खोब्रागडे

लोकशाहीप्रधान भारत देशात केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप पक्षाने संवीधानविरोधी कारवायांची नवीन शृंखलाच चालू केली आहे. याअंतर्गत लोकहितोपयोगी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग बंद करून खाजगीकरणाचा सपाटा सुरू केला आहे. शासकीय भरतीप्रक्रीया कंत्राटी पद्धतीने करून लोकतंत्राची वाताहत केली जात आहे. समाजपरीवर्तनाचे प्रमुख अस्त्र असलेल्या ” शिक्षणा ” चे खाजगीकरण करून बहुजन समाजातील विदयार्थ्यांना शिक्षणापासून वंचीत ठेवून पुनश्च गुलामीच्या सावटाखाली आणण्याचे आटोकाट प्रयत्न विदयमान भाजप सरकारकडून केल्या जात आहे.
राज्यातील सत्ताधारी पक्षाने ६२ हजार शासकीय शाळा बंद करून गोरगरीब जनतेच्या मुलांना शालेय शिक्षणापासून कोसो दूर ठेवले आहे. अनुसूचित जाती व जमाती तसेच बहुजन समाजाला वेठबिगारीचे जीवन जगायला भाग पाडण्यासाठी सत्ताधारी पक्षाने खाजगीकरणाचा पाश आवळलेला आहे व या पाशात बहुजन समाजाचे वाटोळे होणार हे निश्चित आहे. शासनाच्या जुलमी निर्णयाविरूद्ध लढण्यासाठी व मुलांचे भवितव्य नष्ट होण्यापासून वाचविण्यासाठी दि. १० अॉक्टोंबरला विराट महामोर्चाचे आयोजन सार्वभौम युवा मंच व विविध सामाजिक संघटनांद्वारे केले आहे. या आंदोलनात मोठयात मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सदर महामोर्च्याची सुरूवात सकाळी ११ वाजता सिंधी लाईन चौक येथून होईल. सिंधी लाईन ते थेट तहसिल कार्यालयावर जावून महामोर्च्यातील शिष्टमंडळामार्फत तहसिलदारांना निवेदन देण्यात येईल.
रोशन खोब्रागडे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close