तेली समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्याचे यवतमाळ येथे आयोजन
अरविंद वानखडे
यवतमाळ
दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने संकट मोचन रोडवरील संताजी मंदिर प्रांगणात तेली समाजातील सर्व शाकीय वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यात 256 मुलांची तर 228 मुलींची अशी एकूण 484 उपवर वधूची नोंद करण्यात आली आहे. 36 व्या मेळाव्याचे उद्घाटन वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार व महाराष्ट्र प्रांतिकतैलिक महासभेचे अध्यक्ष माननीय रामदास जी तडस यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश भाऊ ढोले. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून मा. सौ संध्या ताई सव्वा लाखे, माननीय बाळासाहेब मांगुळकर माजी उपाध्यक्ष झेडपी यवतमाळ, मा. जयकुमार बेलखेडे, माननीय सुरेश भाऊ वाघमारे माजी खासदार वर्धा, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भाऊ ढवळे, शंकरराव हिंगासपुरे शैलेश गुल्हाने दीपक भाऊ शिरभाते, प्रभाकरराव चव्हाणांनी, दिनेश राव बिजवे, दिलीपराव क्षीरसागर यांची उपस्थिती राहणार आहे.
गेल्या 35 वर्षापासून संताजी मंदिराच्या प्रांगणात अशा प्रकारचा वधु वर परिचय मेळावा अतिशय चांगल्या प्रकारे होत असून समाजातील सर्व शाकीय तेली समाज बांधवांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असतो. या मेळाव्यासाठी शुभमंगलम पुस्तिकेसाठी 484 वधू-वरांचा परिचय दाखल केलेला आहे. सदर मेळाव्याला कमीत कमी पाच ते सहा हजार समाज बांधव उपस्थित राहणार असल्या ने त्यांची भोजनाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली असून त्या पद्धतीचे नियोजन करण्यात आलेले आहेत वधु वर परिचय मेळावा यशस्वी करण्याकरिता अध्यक्ष महेश ढोले. सचिव देविदासजी देऊळकर, रामकृष्ण पगारे, सुरेश राव अजमेरे, विद्याताई पोलादे, अशोक जयसिंगपूर, प्रकाश मुळे, दामोदर मोगरकर, मनोहरराव गुल्हाने, सुरेश जयसिंगपूर, राजेश चिंचोरे, जितेंद्र हिंगासपुरे, दिवाकर राव की नही कर, उत्तमराव गुल्हाने, रामकृष्ण शिरभाते, मुकुंदराव पोलादे, नंदकिशोर जीरापुरे, शिवदास गुल्हाने, किशोर भाऊ गुल्हाने, सौ रेशमी ताई गुल्हाने, राजाभाऊ ढाले, डॉ संजय अंबाळेकर, बाळासाहेब शिंदे, अभिजीत शिंदे, अजबराव तंबाके सर्व समाज बांधव प्रयत्नशील आहे