क्राइम

विनयभंगाचे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्नात असताना आरोपींवर पोलिसांचा गोळीबार 

Spread the love

आंबेडकर नगर / नवप्रहार मीडिया 

                सायकल ने घरी जाणाऱ्या मुलीची ओढणी खेचून तिची छेड काढल्याचा आणि या दरम्यान ती सायकल वरून खाली पडल्यानंतर तिला दुचाकीने चिरडणाऱ्या तिन्ही आरोपींना मेडिकल साठी रुग्णालयात घेऊन जात असतांना पोलिसांची रायफल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्नात असलेल्या आरोपींवर पोलिसांनी गोळीबार केल्याने त्यातील दोन पायाला गोळी लागून जखमी झाले आहेत . तर एकाचा गाडीतुन उडी टाकताना पाय मोडला आहे. या तिघांना पळून जातांना अटक करण्यात आली आहे . या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याबद्दल पोलीस स्टेशन प्रभारी रितेश पांडे यांना निलंबित करण्यात आले आहे
Bold अशी घडली घटना –
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी शाळेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याची ओढणी खेचली होती. यादरम्यान, मागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने तिला चिरडले. विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मृताच्या वडिलांनी तिघांविरुद्ध विनयभंग आणि अपघाताच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान, पोलिसांनी आतीन आरोपींना अटक केली. रविवारी पोलीस तीन आरोपींना तुरुंगात पाठवण्यासाठी वैद्यकीय उपचारासाठी बासखरी सीएचसीमध्ये घेऊन जात असताना तिन्ही आरोंपीनी पोलिसांची रायफल हिसकावून गाडीतून पळ काढला. शाहबाज, अरबाज आणि फैसल यांनी पोलिसांची रायफल हिसकावून घेत कारमधून उडी मारली आणि पळू लागले.
Bold  तिघे आरोपी अटकेत
पोलिसांनी पाठलाग केला असता आरोपींनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तर दिल्यावर शाहबाज आणि फैसल यांच्या पायात गोळी लागली. तर गाडीतून उडी मारताना अरबाजचा पाय मोडला. या घटनेची माहिती मिळताच सीओ तांडा संजय नाथ तिवारी, आलापूर नासिर कुरेशी, तांडा अमित प्रताप सिंग, अलीगंज ब्रिजेंद्र शर्मा मोठ्या पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. व जखमींना बासखरी सीएचसी येथे नेण्यात आले. या संदर्भात पोलीस अधीक्षक अजित कुमार सिन्हा यांनी सांगितले की, चकमकीचा भाग म्हणून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. उपचारानंतर तिघांनाही न्यायालयात हजर करून रिमांडची मागणी केली जाणार आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close