अंजन गावात महाआरोग्य भव्य रोगनिदान शिबिर संपन्न
अंदाजे दोन हजार रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ
अंजनगाव सुर्जी मनोहर मुरकुटे
अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था संचालित चळवळ रुग्ण समिती व दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने *महाआरोग्य भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन ५ सप्टेंबर मंगळवार रोजी प्रभा मंगलम टाकरखेडा रोड येथे आयोजित केले होते.*
या शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला व हजारो रुग्णांनी या शिबिराच्या माध्यमातून लाभ घेतला.शिबिरला सकाळी ९ वाजता सुरवात होवुन ४ वाजेपर्यंत सुरु होते. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या व संतांच्या प्रतिमेचे पूजन,हारार्पण व दिपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रम शिबिराचे उद्घाटन श्री मनोज लोणारकर उपविभागीय अधिकारी दर्यापुर यांनी केले तसेच अध्यक्ष स्थान अंजनगाव सुर्जी चे तहसिलदार श्री रुणय जस्कुलवार यांनी भुषविले.
मंचकावर प्रमुख पाहुणे डॉ. सुधिर डोंगरे,तालुका वैद्यकीय अधिकारी, पोलीस निरीक्षक .दिपक वानखडे,डॉ. अमोल नालट वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय, जपसरे हॉस्पिटल चे संचालक डॉ. कैलास जपसरे, एन. पी. शिंगणे ,डॉ.सतिष महाजन,डॉ.संध्या पजई,सावंगी मेघे,आदी उपस्थित होते.तसेच सर्व मान्यवरांना संत गाडगेबाबा यांचावरिल पुस्तक व झाड देवुन यांचे स्वागत करण्यात आले. राजकीय व सामाजिक क्षैत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन कार्यक्रमाची प्रशंसा केली. या कार्यक्रमात अंजनगाव सुर्जी मधिल नागरिकांना आपली वैद्यकीय सेवा दिली अश्या जेष्ठ डॉक्टर मंडळी मधिल. डॉ. रमेशचंद्र सारडा, डॉ. नानासाहेब हंतोडकर,डॉ.रामचंद्र शेळके, डॉ. राजेंन्द्र कोकाटे, डॉ. मोहन काळे,डॉ.फारुक नवाब, डॉ. अमिन खान, डॉ. एजाज अहमद अ. जलील यांचा त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सन्मानपत्र फ्रेम,संत गाडगेबाबा हे पुस्तक, झाड देवुन गौरवण्यात आले. *शिबिरामध्ये येणार्या सर्व रुग्णासाठी जेवणाची सुध्दा व्यवस्था करण्यात आली होती हे विशेष* शिबिरामध्ये रक्तदाब, ब्लड शुगर,बरेच दिवसाचा ताप,किडनीचे आजार,हृदयरोग,अशक्तपणा, वारवार चकर येणे इ. डोळ्यांचे सर्व आजार, मोतिया बिंदू शस्त्रक्रिया,तिरळेपणा इ.हायड्रोसिल, हर्निया,अंगावरील गाठी,आतड्यांचे आजार, मुतखड्याचे आजार,पोटाचे आजार, गलगंडा(थायरॉईड) इ.महिलांचे आजार,इ.लहान मुलांचे आजार ,फ्रॅक्चर तसेच हाडाचे सर्व आजार
त्वचेचे विविध आजार, कान ,नाक, घशाचे सर्व आजार आजारांचे निदान ,तसेच मॅमोग्राफी व्हँन,डेन्टल व्हँन उपलब्ध होती. तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करून तसेच योग्य उपचार पद्धतीने औषधोपचार विनामूल्य करण्यात आले तसेच शिबिराला अंदाजित ६०० रुग्णांना पुढील मोठ्या आजारांसाठी मोफत उपचारासाठी आयोजकांकडून सावंगी मेघे येथे मोफत वाहन याने तेथे दाखल केल्या जाईल असे सांगण्यात आले. *हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी नियोजन करण्यासाठी अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी, चळवळ रुग्ण समिती व मित्र परिवाराने ग्राउंड लेव्हल वर प्रचंड मेहनत घेतली* कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिलीप सरदार यांनी केले. तर आभार प्रदर्शन अक्षय गवळी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीकरिता अक्षय गवळी(अध्यक्ष),अमोल पुकळे (कोषाध्यक्ष),चेतन सारंदे (सचिव) संतोष देशमुख (सहसचिव),सदस्यगण आकाश फाटे, प्रतीक आंबेकर ,शेखर लोणकर, अंकित सारंदे,अंकुश होटे,अभिनव पिसोळे,पवन आंबेकर, अक्षय वानखडे, संकेत बेलसरे,मयुर वाळके, अक्षय पिसोळे,सुशांत देशमुख,अभिषेक लोळे,आदित्य देशमुख, सागर दातीर,विक्रम सरोदे, रुषभ गुहे, देवेश हाडोळे, नितीन परकाले,अजय मेश्राम,अंकित गोळे,धिरज गवळी,हेमंत पांढरे,संकेत शिंगणापूरे, हिमांशु व्यास,सागर बुंदेले, मुकेश पोरे,साहिल शिंगणापूरे,रोहित खोब्रागडे,त्रुतीक विधळे,सागर शेंडे, शुभम गौर,निखिलेश माहुलकर,अभिनव निचळ, सौरभ पांढरे,अन्वेष विधळे,तुषार गवळी आदिनी मेहनत घेतली.