महाविकास आघाडी पक्षाच्या ठप्प पडलेल्या इंजिनला सर्वसामान्य जनतेला बसण्यासाठी बोगी नसून सर्वच इंजिन देवेंद्र फडणवीसांचा हल्ला
रामदास तडस यांच्यासाठी चांदूर रेल्वेत प्रचार सभा
चांदुर रेल्वे / प्रकाश रंगारी
वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी धामणगाव विधानसभा क्षेत्रातील चांदूर रेल्वे शाळेच्या प्रांगणात देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभेतून आघाडीवर हल्लाबोल केला ते म्हणाले की देशात 26 पक्षांची आघाडी आहे आणि राहुल गांधी त्या इंजिनचे प्रमुख आहेत. तर दुसरीकडे मोदी यांची विकासाची ट्रेन आहे. मोदींच्या रेल्वेला वेगवेगळ्या बोगी असून यात प्रत्येकाला बसण्यासाठी जागा देण्यात आली आहे. गरीब, शेतकरी, आदिवासी सर्व समाजातील नेत्यांना बसण्याची जागा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्रेनमध्ये दिली आहे
एकीकडे मोंदीचे रेल्वे आहे तर दुसरीकडे राहुल गांधी म्हणतात की मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणतात मी इंजिन आहे, मुलायम यांचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे, मात्र तेथे एकही बोगी नाही. सर्व इंजिन आहेत. अशा इंजिन मध्ये सामान्य माणसांना बसायला जागा नसते. त्यात केवळ ड्रायव्हर बसतो, तर त्यात मतदारांना जागा नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
यावर त्यांनी राहुल गांधी,शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.आघाडीचे इंजिन हे ठप्प झाले असल्याचा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला स्थानिक काँग्रेसच्या आमदारांनी सत्ता असल्या नंतरही विकास केला नाही परंतु 2 वर्षात प्रताप अडसड यांनी मतदारसंघाची कायापालट केली जे आमदार मतदारांना पाणी देऊ शकत पण अडसड यांनी 64 कोरोड रूपयाची योजना आणली व येणाऱ्या बजट मध्ये त्यांच्या पुर्ण मागण्या पुर्ण करू लोकसभेचे उमेदवार नावाने पहलवान नाही तर प्रत्यक्षात पहलवान आहे मोदी सरकारकडून 10 वर्षात अनेक विकास कामे त्यानी पुर्ण केली ही निवडणूक ग्रामपंचायतची नसून देश घडविण्याची आहे प्रत्येक मतदारांनी आपले मत योग्य नेतृत्व निवडण्यासाठी घ्यावे आघाडी सरकार अफवा पसरवत आहे की महायुवतीच्या सरकारच्या 400 पार खासदार निवडून आले की संविधान बदलविणार परंतु जो पर्यंत चंद्र सुर्य आहे तो पर्यंत बदलाच संविधान बदलणार नाही कारण बाबासाहेबांचे संविधान ऐवढे कमजोर नाही राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे याकडे विकासावर बोलण्यासाठी जागा नसल्याने अश्या अफवा पसरवित आहे.म्हणून मतदान हे देशहितासाठी करा व रामदास तडस यांना पुन्हा लोकसभेत प्रचंड मतांनी विजयी करून पाठवा असे आवाहन त्यानी केले.यावेळी मंचावर भाजपा आमदार प्रताप अडसड,आमदार प्रविण दटके,सुरेखा ठाकरे,मनोज डाहाके,अनिकेत ठाकरे बबन गावडे पुरूशोतम बनसोड विनय कडू, सुधीर दिवे,अनिता तिखिले,राजेश पाठक,
सभापती प्रशांत भेंडे,विधासभा प्रमुख रावसाहेब रोठे,अर्चना रोठे,दुर्गाबक्षसिग ठाकुर,सविता ठाखरे,बंडू भुते,संजय फुणसे,पप्पू भालेराव,नंदा वाधवानी,राजू चौधरी,संदीप सोळंके,समिर भेंडे हे उपस्थित होते सर्व नेत्याचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविन्द्र उपाध्याय तर आभार प्रदर्शन मनोज डाहाके यांनी केले.यावेळी मतदारसंघातील हजारोंच्या संख्येने भाजपा कार्यकर्ते व जनता उपस्थित होते
राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनिया गांधी आणि राहुल गांधी बसू शकतात. तर शरद पवार यांच्या इंजिनमध्ये केवळ सुप्रिया सुळे बसू शकतात. त्यात अजित पवारांना देखील जागा नाही. तर उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये केवळ आदित्य ठाकरे बसू शकतात, दुसऱ्या कोणत्याच नेत्याला त्यात जागा नसल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाविकास आघाडीचे इंजिन ठप्प पडले आहे, असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मोदींनी दहा वर्षात देश बदलला
ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात विकासाची गती बदलली आहे. दहा वर्षात देश बदलला आहे. गरिबांना पक्की घर दिले, शौचालय दिले, नळाला पाणी दिले, असा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सबका साथ सबका विकास म्हणत महायुतीची ट्रेन पुढे जात असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी तरुणांना कर्ज उपलब्ध करून दिले. आयुष्यमान भारत योजने अंतर्गत मोफत उपचार उपलब्ध करून दिले, असल्याचा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. रामदास तडस यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. या निमित्त त्यांनी तडस यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन देखील केले.