मधुचंद्राच्या दिवशीच नवऱ्याला बायकोने जे सांगितले ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली

कानपूर / नवप्रहार मीडिया
लग्न झाल्यानंतर नवविवाहित जोडप्याला उत्सुकता असते ती मधुचंद्राची (हनिमून ) हनिमून अविस्मरणीय राहावा यासाठी अनेक कपल्स विवाहाच्या काही महिन्यांपासून त्याचे नियोजन करून ठेवतात. ज्यांच्या कडे पैसा आहे ती जोडपी देशातील नयनरम्य ठिकाणी तर काही जोडपी विदेशात जाण्याची त्यासाठी तयारी करतात. ज्यांची आर्थिक स्थिती ठीक नाही ते देखील नाही काही तर देशातल्या चांगल्या ठिकाणी किंवा घरातच हनिमून अविस्मरणीय राहावा यासाठी नियोजन करत असतात.
पण ज्या दिवसाला घेऊन तुम्ही अनेक स्वप्न रंगवली आहेत आणि अनेक दिवसांपासून तुम्ही त्या गोष्टीची वाट बघत आहात त्याच दिवशी तुम्हाला जर पती पत्नीच्या नात्यात कायमची दरी निर्माण होईल अशी कुठली गोष्ट माहीत पडली तर दगडाचे काळीज असलेला व्यक्ती देखील ढासळून जाईल. अशीच घटना कानपुर मधील एका युवकासोबत घडली आहे.
उत्तर प्रदेशात कानपूरमध्ये एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं. कानपूरमधल्या एका कपलचा विवाह गोव्यातल्या आलिशान रिसॉर्टमध्ये पार पडला. वऱ्हाडी मंडळींना विमानाने गोव्यात आणलं गेलं. वधू-वरांनी सप्तपदी पूर्ण केल्या. त्यानंतर लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नीने पतीकडे एक धक्कादायक खुलासा केला. ‘माझं दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम आहे. कुटुंबाच्या दबावामुळे मी हे लग्न केलं,’ असं तिने पतीला सांगितलं. तसंच पतीशी शारीरिक संबंध ठेवण्यास तिने नकार दिला. यामुळे पतीला जबर धक्का बसला.
आयुष खेमकाच्या म्हणण्यानुसार, ‘पत्नीने मला सांगितलं की ती कोणा दुसऱ्यावर प्रेम करते. मी लग्न दबावामुळे केलं.’ त्यानंतर पत्नीचा प्रियकर तिच्या सासरी येत असे. प्रियकराच्या जाण्यायेण्याचं सीसीटीव्ही फुटेज आयुषच्या हाती लागलं. त्यानंतर या पती-पत्नीत वाद सुरू झाले. कुटुंबात कलह सुरू झाला. रोज दोघांमध्ये भांडणं होऊ लागली. आयुषने बदनामीच्या भीतीने ही गोष्ट लपवून ठेवली. पत्नीने त्याच्याशी शरीरसंबंध ठेवण्यास आणि पत्नी म्हणून सोबत राहण्यास नकार दिला. आयुषने याला विरोध केला असता तिनं आत्महत्या करण्याची धमकी दिली. पत्नीने तिचे मामा आणि अन्य कुटुंबीयांना बोलावलं. त्यांनी मारहाण करून घरातले दागिने चोरले, असा आरोप आयुषनं केला. आयुषच्या पत्नीचे मामा शहरातले प्रतिष्ठित व्यापारी आहेत. त्यांची पोलीस विभागात चांगली ओळख आहे.
आयुषने याप्रकरणी एफआयआर नोंदवला होता; पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. तपासकर्त्याने सीसीटीव्हीसह सर्व पुरावे गायब केल्याचा आरोप आहे. बनावट तपशील देऊन अंतिम अहवाल सादर करून प्रकरण बंद करण्यात आलं. यानंतर आयुषने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाने फेरविचार करण्याचे आदेश दिले. डीसीपी सेंट्रल प्रमोद कुमार यांनी एसीपी अन्वरगंज यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवला आहे. या प्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.