मा. हंसराज अहिर व कृ.उ.बाजार समिती नवनिर्वाचित संचालक मंडळ यांचा सत्कार सोहळा सोनु मंगल येथे संपन्न
घाटंजी तालुका प्रतिनिधी – सचिन कर्णेवार.
नुकतेच घाटंजी सोनु मंगलमय येथे मागासवर्ग आयोग अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्या नंतर मा. हंसराज भैय्या अहीर यांचे घाटंजीत प्रथम आगमण व कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचा जाहीर सत्कार सोहळा घाटंजीत पार पडला. या कार्यक्रमात आर्णी विधानसभा लोकप्रिय नेते मा. अण्णासाहेब पार्वेकर, मा. आमदार डॉ. संदीप धूर्वे, गजूभाऊ बेजंकीवार,नितीन कोठारी, सुहास पार्वेकर, सतिश मलकापूरे,माजी अध्यक्ष बालूभाऊ खांडरे,डहाके सर, व इतरही बरीच यांच्यावर मंचकावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. घाटंजीत कृषी उत्पन्न बाजार समिती मधे चूरसिची लढाई असतांना विजय संपादन करण्यात आले हे विजय केवळ काही दिवसांत मिळालेले यश नसून यासाठी प्रत्येक कार्यकर्ता झटत राहिला व सर्वात महत्व म्हणजे एकजूट होऊन कार्यात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्ते मुळे हे यश संपादन करण्यात आले. अण्णासाहेब यांच्या कूशल राजनिती मूळे यशाची शिखरे गाठली हे मान्यवरांच्या भाषणातून मत व्यक्त करण्यात आले.मा. हंसराज अहिर यांनी आपल्या व्यक्तव्यातून मोदी सरकारची कामगिरी व सरकार स्थापन झाल तेव्हापासून देशातील प्रगती, गोरं गरिब, मागासवर्गाला मिळालेल्या लाभा बदल माहिती दिली.हे सरकार आपल सरकार आहे असे वाटते कारण समाजाच्या उत्थानासाठी अविरत प्रयत्न सूरु आहे शासन निर्णय देण्यासाठी सक्षम असून समाज हिताची कार्य अविरत चालू आहे. ग्रामीण भागातील विकासाची कामे ते शहरीकरण सोबत ‘गाव हे शहर तक’ प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे हे त्यांणी उपस्थित जनसमूदायास सांगतले. या कार्यक्रमात घाटंजी परिसरातील नागरिक,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ, पत्रकार बांधव बहूसंखेणी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत उगले सर यांणी केले. प्रास्ताविक चोपडे सर,उपस्थिताचे आभार खरतडे तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम अभिजीत झाडे,अंकूश ठाकरे,ॲड.संदीप माटे, नंदकिशोर डंभारे,शाम खांडरे,महेश ठाकरे व इतरही पदाधिकारी यांनी घेतले.