अभ्यासातूनच आपलं व्यक्तिमत्त्व घडते – क्षितीज अभ्यंकर
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
दरवर्षीप्रमाणे श्री सुखदेवराव अभ्यंकर विद्यालय हंतोडा येथे गणवेश वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुल व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीचे अध्यक्ष क्षितिज अभ्यंकर हे होते, तर प्रमुख पाहुणे हंतोडा येथील प्रतिष्ठित नागरिक बाबुरावजी उंबरकर, प्रकाशराव पटेल , सुभाषराव गोळे ,गजानन आठवले ,प्रभुदासजी आठवले, विद्यालयाचे मुख्याध्यापक केतन खिरकर,उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले , छत्रपती शिवाजी महाराजयांच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.
अध्यक्षीय भाषणातून क्षितिज अभ्यंकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, गणवेश हा विद्यालयाचा महत्वाचा भाग आहे कारण गणवेश परिधान केला की आपल्या कामाची कर्तव्याची जाणीव होते. गणवेशामुळे सर्वजण एकसारखे दिसतात, विद्यार्थ्यांमध्ये एकोप्याची भावना तयार होते. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केला पाहिजे. अभ्यासातूनच आपलं व्यक्तिमत्त्व उजागर होत असते. संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. त्यापैकीच दरवर्षी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो. म्हणून विद्यार्थ्यांनी दररोज गणवेशामध्ये यावे आणि गणवेशाच्या माध्यमातून आपल्या विद्यालयाचा लोकांमध्ये परिचय करून द्यावा, असे विचार मांडले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक केतन खिरकर व सूत्रसंचालन विद्यालयाचे सहायक शिक्षका मयुरी, लोखंडे तर आभार प्रदर्शन सहायक शिक्षका सारिका वाट यांनी केले. विपिन हंतोडकर,अनंता मोहोड श्रद्धा गोळे, भास्कर चव्हाण, धम्मपाल आठवले, अश्वघोष अभ्यंकर , निलेश सावळे तसेच विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते