क्राइम

लॉजवर एकाच ओढणीने गळफास घेत प्रेमी युगलाची आत्महत्या

Spread the love

पुणे / नवप्रहार मीडिया 

              पुण्यातील वाघोली परिसरात प्रेमी युगलाने वाघोली येथील लॉजवर एकाच ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या प्रेमीयुगलाने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार कोमल सुनील बर्के (वय २०,रा. चंदननगर, खराडी, पुणे), सचिन गोकुळ शिंदे (वय २१, सध्या रा. खराडी. नेहरु कॉलनी, भिंगार, अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता दोघेही वाघोली येथील एका लॉजमध्ये आले. त्यांनी खोली घेत लॉज मॅनेजरला संध्याकाळी ६ च्या सुमारास खोली सोडणार असल्याचे सांगितले. दारम्यान ६ वाजून गेले. दोघेही खाली न आल्याने लॉजमधील कामगार याने मुलाच्या फोनवर कॉल केला.

मात्र त्याने उचलला नाही. दरम्यान, लॉजचे कामगार त्यांच्या खोलीजवळ गेले. त्यांनी त्यांच्या खोलीची बेल वाजवली. मात्र, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे कामगाराने दरवाजा वाजवण्यासाठी त्यावर हात मारला असता, दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्याने आत डोकावले असता दोघांनी ही एकाच ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. लॉज मेनेजरने ही बाब पोलिसांना कळवली

पोलिस घटनास्थळी दखल झाले. कोमल ही डीएम एलटीचे शिक्षण घेत होती. तर सचिन हा खासगी नोकरीला होता. त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना नव्हती. दोघांनी आत्महत्या का केली, यामागचे कारण समजू शकले नाही. घटनास्थळी पोलिसांना चिठ्ठी (सुसाइड नोट) सापडली नाही. ससून रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले. पुढील तपास लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काईंगडे करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close
I3