लव्ह जिहाद ; फिरोज कडून ‘जानकी ‘ चे धर्मांतरण ?
अनैसर्गिक संभोग आणि इतरांसोबत संबंध ठेवण्यासाठी दबाब ?
नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया
हिंदू मुलींना हिंदू बनून आपल्या जाळ्यात ओढणे आणि नंतर मग लग्न करण्यासाठी तिच्यावर धर्म परिवर्तनासाठी दबाब टाकणे हा मुस्लिम युवकांनी लावू जिहाद साठी नवीन फंडा आणला आहे. हिंदू युवक समजून अनेक मुली अश्या तरुणांच्या प्रेमात पडतात. आणि जेव्हा त्यांना सत्य कळते त्यावेळी त्या मुस्लिम युवकाची गोष्ट मानणेही त्यांची मजबुरी होऊन बसते. कारण तरुणींनी या युवकांना आपले सर्वस्व अर्पण केलेले असते. एका हिंदू मुलीला आपल्या प्रेमात ओढून तिच्यावर इतर लोकांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाब आणल्याचा आणि ते मान्य न केल्याने तिला आमनुष मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये दावा केला जात आहे की, भुजमध्ये फिरोज नावाच्या मुस्लिम तरुणाने जानकी या हिंदू मुलीला फसवून तिला इस्लाम धर्म स्विकारायला भाग पाडले. आणि तिच्याशी लग्न केले. लग्नानंतर फिरोजने मुलीला इतर लोकांशी संबंध ठेवण्यास सांगितले आणि मुलीने तसे करण्यास नकार दिल्याने फिरोजने तिला बेदम मारहाण केली. पीडित महिलेने मीडियाशी संवाद साधला आणि सत्य सांगितले जे आता व्हायरल झाले आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी याप्रकरणी म्हणाली, ‘ मला ड्रग्जसह इतर व्यवसायात गुंतवायचे आहे, मी नकार दिल्यास तो मला मारहाण करतो. त्याला मला या चुकीच्या धंद्यात अडकवायचे आहे, मी त्यात अडकले आहे, अशा विधर्मींच्या जाळ्यात कोणत्याही बहिणीने अडकू नये.’
दरम्यान पीडित मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अनेक लोकांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुणी दिसत आहे. तिच्या पाठीवर जखमेच्या खुणा आहेत, काळे डाग असून त्वचा अनेक ठिकाणी फाटलेली आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी दृश्ये अस्वस्थ करणारी आहेत. या तरुणीचे नाव जानकी असून फिरोज नावाच्या तरुणाने तिला आमिष दाखवून लग्न केल्याचा दावाही केला जात आहे.
हा व्हिडिओ पोस्ट करताना X हँडल ‘द अॅनालिस्ट (न्यूज अपडेट)’ने लिहिले की, ‘आता वेळ आली आहे की हिंदू मुलींनी ‘मेरा अब्दुल अलग है’ हा आग्रह सोडून द्यावा.’ भुजमध्ये जानकी नावाच्या हिंदू मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. जिहादी फिरोजने तिला इस्लाम धर्म स्वीकारून तिच्याशी लग्न केले. त्यानंतर तो तिला इतरांसोबत शारीरिक संबध प्रस्थापित करण्यास भाग पाडायचा, तसेच तिच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवतो आणि तिला मारहाण करतो. या मुलीची अवस्था बघा, तिला लोखंडी पाईपने मारहाण करून तिची काय अवस्था झाली आहे.
अशीच पोस्ट ‘ऑर्गनायझर वीकली’ या इंग्रजी साप्ताहिकानेही केली होती. त्यात लिहिले होते, ‘गुजरातच्या भुजमध्ये फिरोज नावाच्या एका मुस्लिम तरुणाने एका हिंदू मुलीला कथित रीतीने फूस लावून तिच्याशी लग्न करण्यास भाग पाडले, जानकीने आरोप केल्याप्रमाणे तिला इतरांसोबत शारीरिक संबध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. आरोपींनी जानकीला कशी बेदम मारहाण केली, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे.