हटके

अल्पवयीन मुलासोबत प्रेम आणि पलायन महिलेच्या अंगलट

Spread the love

नाशिक / नवप्रहार ब्युरो 

            प्रेम हे आंधळं असतं असं म्हटलं जातं. प्रेमात वय, जात ,वर्ण कधीच आडवं येत नाही. आपलं प्रेम हस्तगत करण्यासाठी प्रेमी वाट्टेल त्या स्तराला जातात. आणि वाट्टेल ती जोखीम पतकरतात. पण कधी कधी भावनेच्या भरात घेतलेला निर्भय अंगलट सुद्धा येतो. असेच एका 36 वर्षीय महिले सोबत घडले आहे. काही दिवस आपल्या अल्पवयीन प्रियकरा सोबत मौजमजा करणारी ही महिला आता कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे.

 एक 36 वर्षीय विवाहित महिलेला एक 15 वर्षाचा कीशोरवयीन मुलगा आवडायला लागला.एकाच परिसरात रहात असल्याने त्यांच्यात नेहमीच जोलने चालणे व्हायचे. हे बोलनेचालने हळूहळू प्रेमात बदलले. प्रेमात आकंठ बुडालेल्या हा दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि महिला तरुणाला घेऊन पळून गेली.  डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच दोघेही पळून गेले.

पळून जाताना दोघांकडे जास्त पैसे नव्हते. त्यामुळे दोघांचे काही दिवस चांगलेच मजेत गेले. पण नंतर पैसै संपल्यावर दोघही एका मुंबईच्या बांधकाम साईटवर राहिले. त्यानंतर पुढचे दिवस आणखीणच कठीण जाण्याच्या भितीने दोघांनी पुन्हा माघारी जाण्याचा निर्णय़ घेतला आणि दोघे कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.

दरम्यान दोघांच्या कुटुंबियांनी बेपत्ता असल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दिल्या होत्या. त्यानुसार घरी परतल्यानंतर महिलेच्या नवऱ्याने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सूरू केला आहे. यावेळी दोघांनीही मर्जीने पळून जाण्याचा निर्णय घेतला होता. असे तपासात समोर आले आहे. पण मुलगा हा अज्ञान असल्यामे महिलेवर त्याच्या अपहरणाचा प्राथमिक गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे महिलेच्या अडचणी वाढल्या आहेत. या घटनेची चर्चा नाशिकमध्ये चांगलीच रंगली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close