राज्य/देश

 प्रचंड मोठा आवाज ; लोकं घराबाहेर , आवाजाच्या दिशेने जाऊन पाहताच सगळेच हादरले

Spread the love

खरगौन /नवप्रहार न्यूज नेटवर्क

               अचानक प्रचंड मोठा आवाज झाल्याने लोकं घराबाहेर पडली. काहींनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. घटना स्थळावर पोहचताच सगळेच हादरले. कारण तो आवाज होता एका बस च्या पुलावरून कोसळण्याचा. स्थानिक तेथे पोहचले तेव्हा प्रवाशी  वेदनेने विव्हळत होते. स्थानिकांनी मागचा पुढचा बिचारी न करता प्रवाश्यांना बस बाहेर काढणे सुरू केले. पोलिसांना माहिती देन्यात आली . या अपघातात 15 लोकांचा मृत्यू जाहला असून जवळपास 25 प्रवाशी गंभीर जखमी आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी  हलविण्यात आले. प्ररिस्थिती इतकी भयंकर होती की रुग्णवाहिका कमी पडल्याने जखमींना ट्रॅक्टर मध्ये टाकून नेण्यात आले.

खरगोन येथे हा अपघात झाला. 50 फूट उंच पुलावरून ही बस खाली कोसळली. ही बस खरगोनच्या खरगोन टेमला मार्गावरील दसंगा येथे पोहोचली होती. तेव्हा बस चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं अन् बस थेट पुलाखाली कोसळली.

त्यात 15 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 25 लोक जखमी झाले. त्यातील अनेकजण गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अनेकांचे हातपाय मोडल्याचंही सांगितलं जातं. तर काहींच्या डोक्याला मार लागला आहे. या सर्वांवर युद्ध पातळीवर उपचार करण्यात येत आहेत. या अपघाताची माहिती मिळाल्यावर मध्य प्रदेश सरकारने जखमींवर मोफत उपचार तर मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

प्रचंड मोठा आवाज झाला

ही बस इंदौरकडे निघाली होती. रस्त्यातच हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. हा अपघात अत्यंत भीषण होता. बस 50 फूटावरुन कोसळली तेव्हा काही तरी स्फोट व्हावा असा प्रचंड मोठा आवाज झाला. त्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोक घाबरले आणि घराबाहेर पळाले. अनेकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा त्यांना बस कोसळल्याचं दिसून आलं. गावकऱ्यांनी मागचा पुढचा विचार न करता या बसमधून एका एका व्यक्तीला बाहेर काढण्यास सुरुवात केली. पोलिसांनाही तात्काळ वर्दी देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनीही मदत कार्यास सुरुवात केली.

 

 

 

ट्रॅक्टरमधून जखमींना…

तोपर्यंत अग्निशमन दलाच्या गाड्या आवाज करतच घटनास्थळी दाखल झाल्यान होत्या. रुग्णवाहिका येताच आधी जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवण्यात आले. नंतर मृतहेद रुग्णालयात पाठवले. रुग्णावाहिका कमी पडल्या म्हणून त्यांना ट्रॅक्टर ट्रोलीतून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

बघ्यांची गर्दी

अपघात झाल्यानंतर अपघाताच्या ठिकाणी शेकडो लोक जमले. बघ्यांची प्रचंड गर्दी झाल्याने त्यांनाही पांगवण्याचं काम पोलीस करत आहेत. तर बघ्यांमधील अनेक लोक मदत कार्य करत आहेत. या भीषण अपघाताची माहिती मिळताच मृत आणि जखमींच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरात रडारड आणि आक्रोश सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close