१२० रुपयात आरोग्य कार्ड चे वितरण खाजगी फाऊंडेशन कडून सामान्य जनतेची लूट
अंजनगावसुर्जीतील प्रकार
अंजनगावसुर्जी ( मनोहर मुरकुटे )
******** जिल्ह्यातील काही दवाखान्यात उपचार बिलात १५ ते २० टक्के सूट मिळेल या नावाखाली एका खाजगी फाऊंडेशन ने शहरात काही भागात पेंडोल टाकून कॅम्प लावून १२० रुपयात आरोग्य कार्ड वितरणाचा सपाटा सुरू केला असताना सबंधित प्रकार पत्रकारांच्या लक्षात येताच त्यांनी सबंधित माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुधीर डोंगरे यांना कळवताच त्यांनी या कॅम्प ला थेट भेट दिली असता हे शासनाचे कार्ड नसून खाजगी संस्थेचा प्रकार असून ही एक प्रकारे जनतेची लूट असल्याचे समोर येताच कॅम्प च्या कर्मचाऱ्यांनी काढता पाय घेतला
************ शहरात गेल्या दोन दिवसापासून १२० रुपयात परिवारातील सदस्यांचे आरोग्य कार्ड काढून मिळेल व या कार्डवर या खाजगी फाऊंडेशन ने टायप केलेल्या दवाखान्याच्या यादीतील दवाखान्यात उपचार खर्चात १५ ते वीस टक्के सवलत दिली जाते असे सांगून आरोग्य कार्ड काढण्यासाठी येथील पानअटाई या मजूर वर्ग राहत असलेल्या भागात पेंडोल टाकून कॅम्प लावला यात दवाखान्यात उपचार मिळणार असल्याने अनेक सामान्य नागरिकांनी कार्ड बनवून सुद्धा घेतले परंतु पत्रकाराने या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली असता याला कुठलीही शासनाची परवानगी नव्हती शिवाय शासन निर्णयाचे पत्र व शहरातील नगर पालिका,ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य विभागाची कुठलेही ना हरकत प्रमाण पत्र नव्हते तेव्हा सबंधित पत्रकाराने ही माहिती डॉक्टर व अधिकारी असलेल्या ग्रुप वर टाकून याबाबत चौकशी साठी माहिती टाकली याची तात्काळ दखल घेत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुधीर डोंगरे यांनी कॅम्प ला दाखल होत तेथील कर्मचाऱ्यांकडून कागद पत्र तपासले असता कुठलेही शासकीय अधिकृत कागदपत्र दिसले नाही वा कुठल्याही शासकीय प्राधिकरणाची परवानगी दिसली नाही तेव्हा त्यांनी फाऊंडेशन च्या वरिष्ठांशी सदर कॅम्प तत्काळ थांबविण्याचे सुनावले तेव्हा सदर कर्मचाऱ्यांनी गोषा गुंडाळून काढता पाय घेतला यावेळी अनेक नागरिकांची उपस्थिती होती
****************
आयुष्मान कार्ड असताना याची गरज काय?
********** गरीब व सामान्य जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाचे आयुष्मान कार्ड जवळपास सत्तर टक्के लोकांनी काढले असताना आणि त्यावर शासकीय व खाजगी दवाखान्यात मोफत उपचाराची शासनाची अधिकृत सोय असताना या उपचार बिलात केवळ नाममात्र टक्केवारीची खाजगी आरोग्य कार्डची गरज काय असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे
सदर कॅम्प हा जीवनदायी आरोग्य विकास फाऊंडेशन चा असून हा पूर्णपणे खाजगी आहे लोकांना वाटते की काहीतरी शासनाची योजना आहे त्यामुळे पैसे देऊन सामान्य लोक हे कार्ड काढतात खाजगी रित्या काम असल्याने त्याची विश्वासार्हता नसून सदर प्रकार बंद करण्याचे सुनावले व लोकांनीही अश्या होणाऱ्या प्रकारावर सर्व माहिती जाणूनच सहभागी व्हावे यापुढे शहरात व तालुक्यात कुठे शासकीय योजनेतील खाजगी रित्या समांतर प्रकार होत असल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल
डॉ सुधीर डोंगरे
तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले
सदरची आरोग्य कार्ड वितरण व्यवस्था हि शासनाचे अधीन नसून ती आम्ही जीवन दाई विकास फाउंडेशन ह्या प्रायव्हेट संस्थे मार्फत केवळ जिल्हा स्तरावर ह्या योजनेचा जनतेला फायदा करण्याचे दृष्टीने आम्ही शिबीर घेत आहो परंतु आमचे संघटने कडून चुकीने ते शिबीर लावले ते यापुढे आम्ही शहरी स्तरावर राबवणार नाही असे जिवदाई संघटनेचे प्रमुख उमेश कडू यांनी सांगितले