ब्रेकिंग न्यूज
पहा सलमान ला कोण म्हणाले की ही शेवटची ताकीद आहे !
मुंबई / नवप्रहार डेस्क
अभिनेता सलमान खान यांच्या बंगल्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी बिष्णोई गँग ने स्वीकारली असून
या पोस्टमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, हा पहिला आणि शेवटचा इशारा होता. तर पुढच्या वेळी घरावर गोळी चालवणार नाही… अशीही धमकी देण्यात आली आहे.
तुरुंगात बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.लॉरेन्सच्या भावाचे नाव अनमोल बिश्नोई असून त्याची एक सोशल मीडिया पोस्ट रविवारी दुपारी व्हायरल होते आहे.
आज सकाळी सलमान खान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट च्या बाहेर दोन अज्ञात मोटरसायकलस्वारांनी गोळीबार केला आणि तेथून पळ काढला. तेव्हापासून गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. शिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सलमानशी फोनवर चर्चा केली आहे. गुन्हे शाखा आणि पोलिसांचे फॉरेन्सिक पथक तपासात गुंतले असून सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले जात आहे. या दरम्यान ही धमकीवजा पोस्ट व्हायरल होत असल्याने नव्याने खळबळ उडाली आहे
मीडिया रिपोर्टनुसार अनमोल अमेरिकेत असतो, त्याने या पोस्टमधून सलमान खानला धमकीही दिली आहे. या पोस्टमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, हा पहिला आणि शेवटचा इशारा होता. तर पुढच्या वेळी घरावर गोळी चालवणार नाही… अशीही धमकी देण्यात आली आहे.
अनमोल बिश्नोईच्या या फेसबुक पोस्टमध्ये ‘हा हल्ला केवळ ट्रेलर होता’ अशी थेट धमकीच देण्यात आली आहे. व्हायरल होत असलेली ही पोस्ट अशी आहे की, ‘ओम जय श्री राम, जय गुरुजी जांभेश्वर, जय गुरु दयानंद सरस्वती, जय भारत. आम्हाला शांतता हवी आहे. अन्यायाविरुद्ध निर्णय युद्धातून घेतला जात असेल तर युद्धच योग्य आहे. सलमान खान आम्ही तुला हे फक्त ट्रेलर दाखवण्यासाठी केले आहे, जेणेकरून तुला आमची ताकद समजेल. आमच्या ताकदीची आणखी परीक्षा घेऊ नको. हा पहिला आणि शेवटचा इशारा आहे. यानंतर फक्त घरावर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत.’
या पोस्टमध्ये पुढे असे म्हटले आहे की, ‘ज्या दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलला तू देव मानले आहेस, त्यांच्या नावावर दोन कुत्रे आम्ही पाळळेत, बाकी मला फारसे बोलायची सवय नाही. जय श्री राम जय भारत सलाम शाहिदा.’ अनमोलच्या या पोस्टच्या शेवटी लॉरेन्स बिश्नोई ग्रुप, गोल्डी ब्रार, रोहित गोदारा, काला जठारी अशी नावंही लिहिली आहेत.
ईद साजरी केल्यानंतर २ दिवसांनीच सलमाच्या घरावर झालेल्या या हल्ल्यामुळे त्याचे चाहते चिंतेत आहेत. याआधीही सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांना अशी धमकी मिळाली होती, त्यानंतर त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आलेली. तरीही असा हल्ला झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याआधी गेल्यावर्षी मार्च महिन्यातही सलमानच्या ऑफिसमध्ये एक मेल आलेला, ज्यामध्ये त्याला जीवे मारण्याची धमकी दिलेली होती. याशिवाय त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते.