सामाजिक

जनसामान्यांच्या हिताची संस्था म्हणजे लोकमंगल नागरी सहकारी पत संस्था- डॉ. रवींद्र भोळे

Spread the love

उरुळी कांचन ( पुणे ) :- धकाधकीच्या जीवनात एखादी संस्था सामान्य ग्राहकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करते ती संस्था म्हणजे लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था हे आवर्जून नमूद करावे लागेल खऱ्या अर्थाने सभासदांच्या विश्वासास सार्थ ठरली असल्याचे मत जेष्ठ समाजसुधारक डॉ रवींद्र भोळे यांनी उरुळी कांचन (ता.हवेली) येथील लोकमंगल पतसंस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सन्मान कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून भाषणात व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक शिवाजी माळी उपस्थित होते. याप्रसंगी पुणे विभागीय आधिकारी कमलाकर पाटील, संस्थेचे सल्लागार सुलभा साळुंखे, रतिकांत यादव, संतोष चौधरी, नंदकुमार मुरकुटे, परीघा कांचन, अलका मदने, शुभांगी परिट, जेष्ठ समाजसुधारक डॉ रवींद्र भोळे, नितीन खैरे, शाखाधिकारी अभिजित साखरे, कर्मचारी मयुरी बोडके, मृणाल कांचन, सोनाली वाले, महेश फुलझळके, अनिकेत जगताप आदी विद्यार्थी पालक संस्थेचे सर्व कर्मचारी वर्ग सभासद उपस्थित होते. कु.समीक्षा सोनवणे इ.१० वी.९६.४० टक्के, कु.स्मृती पवार इ.१० वी.९५.०० टक्के, कु.श्रेया विभुते इ.१० वी.८२ टक्के, कु.प्रज्वल भोसले इ.१० वी.
कु.श्रेया पोपळघट इ.१२ वी.९१.८३ टक्के, कु.हर्षल कड इ.१२ वी.९१.३३ टक्के, कु.वेद कौलवार इ.१२ वी.८३.६७ टक्के.. या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षात इयत्ता १२ वी, इयत्ता १० वी मधील यश संपादन केल्याने संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिकेत जगताप यांनी मानले आभार शाखाधिकारी अभिजित साखरे तर सूत्रसंचालन अमोल भोसले यांनी मानले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close