शैक्षणिक

जिल्हास्तरीय बाल क्रिडा व सांस्कृतीक महोत्सवात प.स.आर्वीने मारली बाजी

Spread the love
आर्वी / प्रतिनिधी
नुकतेच दिनांक ०५ ते ०७ फेब्रुवारी २०२४ ला. जिल्हा क्रिडा संकुल वर्धा येथे पार पडलेल्या जिल्हा स्तरीय बाल क्रिडा व सांस्कृतीक महोत्सवात जिल्ह्यातील आठही पंचायत समितीच्या चमु सहभागी झाल्या होत्या. या तिन दिवसीय महोत्सवामध्ये विविध मैदानी सांघीक खेळ, वैयक्तीक खेळ व सांस्कृतीक स्पर्धा पार पडल्यात. सदर महोत्सवामध्ये एकुण आठही पंचायत समितीमध्ये पंचायत समिती आर्वीने सर्वाधीक खेळ व सांस्कृतीक स्पर्धामध्ये प्रथम क्रमांकाने विजय प्राप्त केला. सदर स्पर्धामध्ये आर्वी पंचायत समिती कडुन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सालफळ, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोथली (किन्हाळा), जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कासारखेडा, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रसुलाबाद, यांनी विशेष प्रयत्न करून विजयाची पताका खेचुन आणुन चॅम्पीयन शिल्डचे मानकरी ठरलेत. या शाळांचे मुख्याध्यापक व क्रिडा मार्गदर्शक शिक्षक पुढील प्रमाणे संजय शेळके, भानुदास आजनकर, मारोती विरूळकर, मिना चोपडे, महादेव कंगाली, वंदना ठाकरे, जिवण गवारने व इतर शिक्षक.
सदर स्पर्धेसाठी सर्व चमुंना आर्वी तालुक्याच्या गटविकास अधिकारी श्रीमती सुनिताताई मरस्कोल्हे, गटशिक्षणाधिकारी सुरेश पारडे, विस्तार अधिकारी पंकज तायडे, पद्मा तायडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
आर्वी पंचायत समितीला मिळालेल्या चॅम्पीयन शिल्डचे सर्व श्रेय सर्व चमुंनी गटविकास अधिकारी श्रीमती सुनिताताई मरस्कोल्हे यांना दिले आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close