क्राइम

लॉज या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या लॉज मालकाला अटक 

Spread the love

तीन महिलांची सुटका 

सातारा /. नवप्रहार ब्युरो 

            लॉज या नावाखाली तरुणी आणि महिलांना ठेवून त्यांच्या कडून देहव्यापार करवून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी लॉज वर धाड टाकत लॉज मालकाला अटक केली आहे. तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. घटना फलटण तालुक्यातील जाधववाडी येथील आहे. प्रवीण रंगराव पवार (रा. विडणी, ता. फलटण)  असे लॉज मालकाचे नाव आहे. त्याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दि. 22 जुलै रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला जाधववाडी, ता. फलटण गावच्या हद्दीतील ऑरेंज लॉज येथे वेश्या व्यवसायाकरता मुली ठेवल्याची असून लॉज चालक हा मागणी करेल त्या ठिकाणी ग्राहकांना मुली पुरवतो, अशी माहिती मिळाली. त्यामुळे या लॉजवर धाड टाकून लॉज चालक प्रवीण पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच तेथील 3 पीडित महिलांची सुटका केली.

याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. सपोनि रोहित फार्णे, नितीन माने, फौजदार श्वेता पाटील, विजयामाला गाजरे, पोलिस रामचंद्र गुरव, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, रविराज वर्णेकर, क्रांती निकम, राणी फाळके, अवघडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close