शाशकीय
पोट निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात स्थानिक सुट्टी जाहीर
नागपूर दि.12: जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील 53 ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुका 18 मे रोजी होणार आहेत. पोट निवडणूक कालावधीत मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता यावे, यासाठी 18 मे रोजी पोट निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्थानिक सुट्टी जाहिर केली आहे.
तालुक्यानिहाय पोट निवडणूक होणाऱ्या 53 ग्रामपंचायत या प्रमाणे आहेत. काटोल-6, नरखेड-7, सावनेर-3, कळमेश्वर-4, रामटेक-3, पारशिवणी-2, मौदा-4, रामटेक-3, कामठी-2, उमेरड-2, भिवापूर-9, कुही-6, नागपूर ग्रामीण- 2, हिंगणा-3.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1