न.प. घाटंजी अंतर्गत असलेल्या महीला बचतगटांना एच डी एफ सी बॅंके कडून पाच लाखांपर्यंत कर्ज वितरण.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
महीला गटाला यापूर्वी नगर परिषद घाटंजी कडून केवळ तीनच बँकेत बचत गटाला लिंकेज करता येतं होते. परंतु, घाटंजी शहरात काही दिवसापूर्वी HDFC बँक ही खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठया बँकेची शाखा सुरु झाली. HDFC बँकेचे व्यवस्थापक यांना बचत गटाशी आपली बँक लिंक करण्यात यावी यासाठी नगर परिषद कार्यालय घाटंजी यांचेकडून विनंती करण्यात आली. सदर विनंतीला बँकेकडून तात्काळ प्रतिसाद मिळाला. यापूर्वी एकविरा बचत गटाला दुसऱ्या बँकेकडून केवळ एक ते दीड लाख एवढेच कर्ज मिळत होते परंतु, HDFC बँकेने सदर गटाचा आर्थिक रेकॉर्ड पाहून सातलक्ष रुपयाचे कर्ज मंजूर करू असे आश्वासन दिले. परंतु, एकविरा महिला बचत गटाला केवळ पाच लक्ष रुपये कर्ज हवे होते त्यामुळे त्यांना सुरवातीलाच पाच लक्ष रुपये कर्ज वितरित करण्यात आले. यासोबतच घाटंजी शहरातील बचत गटांना बँक लिंकेज करण्यासाठी चौथी बँक उपलब्ध झाली त्यामुळे भविष्यात अजून बचत गट HDFC बँकेशी लिंकेज होऊ शकतात.
दि.07जुलै 2023 दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, नगर परिषद घाटंजी अंतर्गत एकविरा महिला बचत गट ,घाटंजी यांना प्रथमच HDFC बँक कडून 5,00,000/- कर्ज मिळवून देण्यात आले. मुख्याधिकारी तथा प्रशासक अमोल माळकर यांच्या उपस्थितीत कर्ज वितरण करण्यात आले आहे. सदर कर्ज रकमेतून महिलांना लघु उद्योग, गृह उद्योग उभे करून महिला सक्षमीकरण करावे तसेच उद्योगाच्या माध्यमातून इतर महिलांना रोजगार मिळावा याकरिता प्रयत्न करावे, सदर कर्जाची परतफेड नियमित करून बँकेत बचत गटाची पत वाढवावीं जेणेकरून दुसऱ्या टप्प्यात बचत गटाला वाढीव कर्जपुरवठा करणे बँकेला सोयीचे जाईल, असे मत मुख्याधिकारी तथा प्रशासक अमोल माळकर सर यांनी मांडले. सदर कर्ज वाटपाला एकविरा महिला बचत गटातील सर्व सभासद , मुख्याधिकारी तथा प्रशासक अमोल माळकर सर,बँक व्यस्थापक प्रफुल भुप्ता सर,RM पवन ठाकरे, रवी खंदारे व सर्व बँक कर्मचारी व NULM समन्वयक सदानंद आडे उपस्थित होते.