शैक्षणिक

वर्धमान कॉलेज ऑफ  फार्मसी च्या मॅनेजमेंट ची अरेरावी

Spread the love
विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्याचा आरोप

क्षेत्रीय संचालक तंत्र शिक्षण यांच्या आदेशाला कॉलेज प्रबंधनाकडून केराची टोपली
न्याय मागणीसाठी  विद्यार्थी उपोषणावर
राजकीय पुढाऱ्यांची चुप्पी 
कारंजा / प्रतिनिधी
          एकीकडे शासनाचा शिक्षणापासून कोणीही वंचित राहता कामा नये असा आदेश असताना येथील वर्धमान कॉलेज ऑफ फार्मसी च्या संचालक मंडळा कडून या आदेशाला खो देण्याचा प्रयत्न झाला आहे. इतकेच काय तर क्षेत्रीय संचालक तंत्र शिक्षण यांच्या आदेशाला देखील केराची टोपली दाखविण्यात आली आहे.
                  कारंजा लाड तालुक्यातील कोळी येथे वर्धमान कॉलेज ऑफ फार्मसी नावाने कोळी येथे कॉलेज आहे. या कॉलेज मध्ये काही विद्यार्थ्यांनी बी फॉर्म विभागात सन 2022- 23 साठी प्रवेश घेतला होता. त्यांची दुसऱ्या वर्षाची सिमिष्टर 3 ची परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी कॉलेज ला गेले असता त्यांना परिक्षेला जान्यास मज्जाव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी दि.29/8/2023रोजी संचालक यांच्या कडे लेखी तक्रार करून मोबाईल वर देखील तक्रार केली होती.
आदेशाला केराची टोपली – विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यावर संचालक यांनी दी. 30/10/2023 रोजी पत्र क्रं. विकाअ /लेले/ 2023/3002 पत्र पाठवून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवू नये असे आदेश बजावले होते.असे असताना देखील प्रबांधनाने विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू न दिल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. म्हणजेच वर्धमान कॉलेज क्या संचालकांकडून अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
न्याय मागणीसाठी विद्यार्थी उपोषणावर – कॉलेज प्रबंधन विद्यार्थ्यांच्या मागणीला भिक घालत नसल्याने सरतेशेवटी विद्यार्थ्यांनी उपोषणाचा मार्ग आवलंबला आहे. ते अमरावती येथे उपोषणाला बसले आहे.
राजकीय पुढाऱ्यांनी चुप्पी –  विद्यार्थ्यांच्या या प्रश्नावर मात्र आमदार ,खासदार  यापैकी कोणीही भाष्य करीत नसल्याचे पाहायला मिळत आहे. इतक्या गंभीर विषयावर राजकीय पुढारी चुप्पी साधून असल्याने नागरिकांत विविध चर्चेला पेव फुटले आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close