लिंगपिसाट खरात च्या बायकोवर गुन्हा दाखल , बायको फरार

चौकशी जसजशी वाढत आहे तसतसे नवीन खुलासे होत आहेत.
अनेक व्हाईट कॉलर या प्रकरणात अडकण्याची शक्यता
नाशिक / विशेष प्रतिनिधी
अनेक महिलांची आर्थिक पिळवणूक आणि लैंगिक शोषण करणाऱ्या लिंगपिसाट अशोक खरात प्रकरणात पोलिसांचा तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे नवीन खुलासे होत असल्याने या प्रकरणाची व्याप्ती आता वैद्यकीय क्षेत्रापर्यंत पोहचली आहे. इतकेच काय तर पोलिसांनी खरात या बायकोवर देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या खरात ची बायको फरार झाली असून पोलिस तिचा शोध घेत आहेत.
अहिल्यानगरमधील शिर्डीमध्ये पोलिसांत कल्पना खरातच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरात फरार झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. कल्पना खरातला अटक करण्यासाठी शिर्डी पोलीस मागावर आहेत. कल्पना खरातला अटक करण्यासाठी दोन पथके नाशिक आणि पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फरार झालेल्या कल्पना खरातला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सोनोग्राफी सेंटर रडारवर
डॉक्टरांपाठोपाठ एक सोनोग्राफी सेंटर आणि मेडीकल स्टोअरही पोलीस यंत्रणेच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंग निदान चाचणी केली जात होती का? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. एका विशिष्ट मेडीकल स्टोअरमधून गुंगी येणाऱ्या वेदनाशामक आणि इतर काही गोळ्या औषध खरेदी केली जात होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
भोंदू खरातकडे ४ सीमकार्ड
भोंदू अशोक खरातची आज देखील एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. भोंदू अशोक खरात 4 मोबाईल नंबर वापरत असल्याची माहिती समोर आलीये. एक नंबर फक्त VIP लोकांसाठी वापरत असल्याची माहिती तपासात समोर आला आहे. तर दुसऱ्या नंबर हा विशेष काही भक्तांसाठी आणि महिलांसाठी वापरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिसरा नंबर हा आर्थिक व्यवहार बघण्यासाठी वापरत असल्याची माहिती समोर आलीये. तर चौथा नंबर हा सर्वसामान्य लोकांसाठी असल्याची माहिती होता. फॉरेन्सिक टीमकडून सर्व नंबर आणि मोबाईलचा डाटा रिकव्हर करण्याचे काम सुरू आहेत.




