लिंगार्चन सोहळा श्री ज्ञानेश्वर संस्थान पुसद येथे संपन्न
श्री ज्ञानेश्वर संस्थान पुसद याचा पुढाकर
राजेश सोनुने पुसद तालुका प्रतिनिधी
विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध झालेले
श्री ज्ञानेश्वर संस्थान पुसद या संस्थानच्या वतीने चातुर्मासानिमित्त या कालावधीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन केले जात आहे. यामध्ये 10 सप्टेंबर ,11 आणि 12 या तीन दिवस मध्ये श्रावण महिन्यानिमित्त्याने विशेष कार्यक्रमाचे लिंगार्जन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने भाविकांना तीन दिवस लिंग बनवून त्याचे पूजन अर्चना आणि आरती करून तिन्ही दिवस नदीवर जाऊन विसर्जन करणे हे उपक्रम तीन दिवस करण्यात आले.
शेवटच्या तिसऱ्या दिवशी होम हवन पूजा आरती सर्व केल्यानंतर तिसऱ्या दिवशी केलेल्या लिंगाचे विसर्जन करण्यात आले त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले स्थानिक भाविकांना तीर्थस्थळी जाऊन हे सर्व धार्मिक विधी करणे शक्य नसते त्याकरिता मुकुंद कळशे गुरु आणि इतर चार ब्राह्मण यांच्या अधिपत्याखाली हा उपक्रम संस्थांमध्ये आयोजित केला होता .
या लिंगार्चन सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या भाविकांना शास्त्रोक्त आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्व विधिवत पूजन हवन केल्यामुळे हा लिंगार्चन सोहळा साजरा केल्याचा समाधान भाविकांना लाभला.