जीवन प्राधिकरणाच्या प्रदूषित पाण्यामुळे व अनियमित पाणी पुरवठा मुळे यवतमाळ कर त्रस्त
अरविंद वानखेडे
यवतमाळ – शहरात पाण्याची समस्या न संपणारी असेच चित्र पाहावयास मिळत आहे. कारण ३०२ कोट्यवधी रुपयांची अमृत योजना ही मृत योजना झाली असून प्रशासनाचे व अधिकारी याकडे कुठलेही लक्ष नाही.
जनतेची पाणी समस्या सोडविण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी व पालकमंत्री समस्या सोडविण्यासाठी उत्सुक नाही फक्त मोदींच्या नावाने निवडून येणे हेच यांचे कार्य असल्याचे दिसून येत आहे. केंद्रातून व राज्यातून
योजना आणायच्या आणि या योजनांचा गाजावाजा करून त्यावरील मलिंदा लाटायचा व अर्धवट योजना करून ठेकेदारांना सोडून द्यायचे तसेच जनतेला सुद्धा वाऱ्यावर सोडल्या जात आहे.
विशेष म्हणजे यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी ३ धरणे आहेत आणि या धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतांना सुद्धा नागरिकांना पिण्याच्या पाण्या करिता ८ ते ९ दिवस वाट बघावी लागत आहे. नळाला पाणी नसल्याने जनतेची पाण्या करीता वन वन सुरू आहे.
जनतेला भर उन्हाळ्यात तहानलेल्या अवस्थेत ठेवण्यात या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी यांना आनंद वाटतो की काय पाणी पुरवठा सुरळीत होत नसून पाणी पुरवठा केला तर पाणी गडूळ येत आहे.जनतेला गढूळ पाणी पिण्याचे वेळ एप्रिल महिन्यातच आली असून मे व जून महिना अद्यापही बाकी आहे. जीवन प्राधिकरणाकडे असलेले फिल्टर बिनकामाचे झाले आहे का? असा प्रश्न नागरिकांना निर्माण झाला आहे.
आठ ते नऊ दिवसांनी नळ दिल्यानंतर सुद्धा नळाला फोर्स सुद्धा राहत नाही त्यामुळे नागरिकांना पाणी भरण्यासाठी त्रास होत आहे.
तरी संबंधित जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांनी जनतेच्या समस्या कडे लक्ष देऊन तळा जवळील गाळ मिश्रित घडून दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा बंद करावा तसेच निळोणा धरणाचे पाणी इतरत्र वर्ग न करता हे पाणी नागरिकांना पिण्यायोग्य फिल्टर करून नागरिकांच्या सोयीसाठी ठेवावे.
तसेच शहरात दरवर्षी पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो तशी वेळ नागरिकांवर न यावी याकरिता तात्काळ उपायोजना करून पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन अधिकाऱ्यांनी करावे अशी मागणी यावेळेस वार्ड क्रमांक २३ मधील नागरिक मनोज मडावी,दीपक डहाके,जयसिंग मोरे, कैलास जाधव, सुमित्रा तोडसाम, चित्रा कडूकार, अर्चना शेंद्रे, ज्योती दुबे, दिनेश हरणे पाटील
आपल्या निवेदनात केली आहे.