क्राइम

गडेगाव येथील लेआऊट प्रकरण वादाच्या भोवरात

Spread the love

प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे फेरफार विषय प्रलंबीत ; लेआऊट मालकाकडून भुखंडधारकांची फसवणूक व कमालीचा मनस्ताप

 लाखनी – तालुक्यातील गडेगाव येथे लेआऊट विक्री संदर्भात भुखंडधारकांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. याप्रकरणी लेआऊट मालकांवरती फसवणूक व मानसिक त्रास दिल्याचा गुन्हा नोंद करण्याची मागणी पिडीत भुखंडधारकांनी केलेली आहे.
प्राप्त माहीतीनुसार शिरीष निर्वाण व गोस्वामी परीवार रा. लाखनी यांनी लाखनी तालुक्यातील मौजा गडेगाव येथील गट क्रमांक २२७ मधील ०.४० हेक्टर आराजी शेतजमीन विकत घेतली व त्याठिकाणी लेआऊट तयार करून १४ भुखंडांची विक्री पण केली. या सर्व बाबी करताना लेआऊट मालकाने नगररचना कार्यालयातील तरतुदींची पूर्तता न करता तसेच स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र न घेता सदर भुखंडांची सर्रास विक्री केली. वास्तविक पाहता लेआऊट तयार करण्यापूर्वी त्याठिकाणी रस्ता , विदयुत खांब , नाली बांधकाम इ. प्रकारच्या सोयीसुविधा तयार करूनच लेआऊटमधील भुखंडांची विक्री केली जाते. परंतु लेआऊट मालकाने कोणतीही कायदेशीर प्रक्रीया केली नाही.
लेआऊट मधील १४ भुखंडांपैकी १) सुखदेव श्रीराम मस्के , गडेगाव (भुखंड क्र.१ ) , कोमल वंजारी , लाखनी ( भुखंड क्र. ७ व ८ ) , नाना पडोळे , मुरमाडी (भुखंड क्र. २) , व राजु बडगे , सावरी (भुखंड क्र. ३) यांनी खरेदी केले होते. परंतु जमीन हस्तांतरीत करताना ग्रामपंचायत गडेगाव कार्यालयाकडून जमीन हस्तांतरण (फेरफार) थांबविण्यात आलेले आहे. यांमुळे भुखंड धारकांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच लेआऊट मालक शिरीष निर्वाण यांनी ज्या शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी केली होती त्यांच्याच नावाने अकृषकतेचे (NA) प्रमाणपत्र घेतले. यामध्येही जमीन मालकांची फसवणूक झाली आहे. या सर्व गैरप्रकारांमध्ये लाखनी तालुका तहसिलदार , मंडळ अधिकारी समाविष्ट असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
सदर प्रकरणाची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी पिडीत भूखंड धारकांनी केलेली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close