क्राइम

जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीतांना अटक

Spread the love

प्रतिनिधी अमित वानखडे

नागपुर ,पो.स्टे. कळमेश्वर अंतर्गत ०७ किमी. अंतरावरील उबाळी शिवार कळमेश्वर येथे दिनांक २८/०७/२०२३ चे १४/२० वा. ते १५/१० वा. दरम्यान पोलीस स्टेशन कळमेश्वर येथील पोलीस पथक आपल्या स्टाफसह पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन कळमेश्वर पोलीस पथकाने तेलगाव मार्गे भोपाळ ते नागपूर रोडवर नाकाबंदी करुन सदर वाहन थांबविले असता आयसर गाडी क्र. एम. एच. ४० / सि. एम. – ४३६६ चा चालक आरोपी नामे- अफजल अनवर खॉ, वय २७ वर्ष, रा. वार्ड नं. ११ लक्ष्मीनारायण नगर बैरसीया भोपाल (म.प्र) २) मुजाहीद मुमताज खाँ, वय २७ वर्ष, रा. ग्राम पबई कुरवाई पोस्ट ऊहर त बासौदा पबई (कुरवाई) विदीशा (म.प्र) यांनी आपल्या वाहनात १) १४ नग जिवंत बैल गोवंश २) ११ नग मृत बैल गौवंश जनावरे महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्या बंदी असल्याचे माहीत असताना सुध्दा गोवंश जनावरांना अत्यंत क्रूर व निर्दयतेने वाहनात डांबुन आखुड दोरीने पाय व तोंड बांधुन चारा पाण्याची सोय न करता दाटीवाटीने अपुऱ्या जागेत कोंबुन वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने सदर आरोपीतांकडुन १) १४ नग जिवंत बैल गोवंश प्रत्येकी २०,००० /- रू असा एकुण २,८०,०००/- रू. चे गोवंश २) ११ नग मृत बैल गौवंश किंमती ०० /- रूपये ३) आयसर गाडी क्र. एम. एच. – ४० / सि.एम. – ४३६६ किंमती अंदाजे २०,००,०००/- रूपये असा एकुण २२,८०,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे- पो.शी. अंकित ठाकरे ब. नं. २३३२ पो.स्टे. कळमेश्वर यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. कळमेश्वर येथे वरील आरोपीतांविरुध्द कलम २७९, ४२९, ३४ भादंवि सहकलम ११(१) (घ) (ड) (च) प्राण्यांना निर्दयतेने वागणुक प्रतीबंधक अधिनीयम १९६०, सहकलम ५ (अ), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधीनीयम १९९५, सहकलम ११९ महाराष्ट्र पोलीस अधिनीयम १९५१ सहकलम १८४ मो. वा. का. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपीतांना अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सहायक फौजदार सुनिल मिश्रा ब. नं. ४६७ पोस्टे. कळमेश्वर हे करीत आहे.

सदरची सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. विशाल आनंद, मा. अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन कळमेश्वर येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे, सहायक फौजदार सुनिल मिश्रा, पोलीस नायक कैलाश उइके, पोलीस शिपाई अंकित ठाकरे, मनिष सोनोने यांनी केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close