शाशकीय

चार्ज हाती घेताच आयुक्त ऍक्टिव्ह मोडमध्ये ; लक्ष्मीनगर झोन चे 2 अभियंता निलंबित 

Spread the love

नागपूर / विशेष प्रतिनिधी

                मनपा आयुक्त तथा प्रशासक यांनी पदभार स्वीकारताच लक्ष्मीनगर झोन च्या दोन अभियंत्यावर त्यांनी कामाची गुणवत्ता न तपासता आणि मुदतीत काम पूर्ण केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या  झोनमधील उपअभियंता आनंद लामसोंगे व कनिष्ठ अभियंता शैलेश जांभुळकर असे निलंबित झालेल्या कनिष्ठ अभियंत्यांची नावे आहेत. मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील मूलभूत समस्यांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे स्पष्ट केले होते. या कारवाईने कर्मचारी वर्गात खळबळ माजली आहे.

  मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील मूलभूत समस्यांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे स्पष्ट केले होते.  त्यानुसार त्यांनी सर्व झोन कार्यालयाची पाहणी करणे सुरू केले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी लक्ष्मीनगर झोनला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी विविध विभागाचा दौरा करून आढावा बैठकीतही हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा दिला होता.

             अखेर आज त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी लक्ष्मीनगर झोनमधील दोन कनिष्ठ अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई केली. लक्ष्मीनगर झोनमधील उपअभियंता आनंद लामसोंगे व कनिष्ठ अभियंता शैलेश जांभुळकर असे निलंबित झालेल्या कनिष्ठ अभियंत्यांची नावे आहेत. लामसोंगे मूळ स्लम विभागातील तर जांभुळकर सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागातील आहेत. लक्ष्मीनगर झोनमध्ये काही भागात नव्याने सिवेज लाईन टाकण्यात आल्या. परंतु त्यांची सदोष जोडणी करण्यात आली.

कंत्राटदाराने केलेल्या कामाची पाहणी करून कामाची गुणवत्ता तपासणे गरजेचे होते. परंतु या सिवेज लाईन सदोष असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. नागरिकांच्या तक्रारीकडेही दुर्लक्ष करण्यात आले.  याप्रकरणी मुख्य अभियंता राजीव गायकवाड यांनी चौकशी केली. चौकशी अहवाल आयुक्तांकडे सादर केला. त्यानुसार आज मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका असलेल्या प्रस्तावावर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी स्वाक्षरी करीत दोघांच्याही निलंबनाचे आदेश काढले. निलंबनाच्या काळात दोघांनाही पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close