कुत्र्याने कोंबडी पकडल्याच्या करणावरून वाद

तीन जणांना चार चाकी वाहन अंगावर घालुन चिरडले
नाचोंना प्रकरणातील दोन आरोपीना अटक
दर्यापूर :- कुत्र्याने कोंबडी पकडल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि नंतर राग अनावर झाल्याने अक्ख्या कुटुंबाला वाहानाने अक्षरशः कुचलून ठार मारले, यात तीन जण जागीच ठार झाल्याने नाचोना गावात खळबळ उडाली
दर्यापूर तालुक्यातील छोटेसे गाव असलेल्या ग्राम पंचायत नाचोना ( खल्लार पो स्टे हद्दीत ) या गावात चंदन राधेश्याम गुजर याचा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय होता, अनेक वर्षांपासून असलेल्या या व्यवसायाने भक्कम पैसा कामावल्याने चंदन ची गावात मगृरी वाढली होती , अनेकांना धमक्या, भांडण नित्याचे झाले होते त्यात मागील काही दिवसांपूर्वी पोलिसांची धाड पडल्याने व्यवसायात नुकसान झाले होते, ही माहिती घरासमोर राहणाऱ्या अंभोरे कुटुंबियांनी पोलिसांना दिली असल्याचा संशय वाढल्याने त्याचा राग निर्माण झाला होता, त्यात अंभोरे यांच्या कुत्र्याने कोंबडी पकडल्याची ठिणगी पडली आणि वादाला सुरुवात झाली,
मंगळवारी रात्री अंभोरे कुटुंबीय घरासमोर शेकोटी करून बसले असताना चंदन गुजर याने वाद घालत मारहाण केली, यात किशोर अंभोरे यानेही प्रत्युत्तर देत चंदन ला मारहाण केली हाच राग धरत चंदन गुजर ने त्याची मेक्सिमो गाडी चारचाकी काढली आणि थेट अंभोरे कुटुंबियांच्या अंगावर घातली यात जोरदार धडक बसल्याने शामराव लालू अंभोरे 70 यांना जबरदस्त मार लागला , अंभोरे कुटुंबियांना मधील अनुसया अंभोरे 67 यांनी त्यांना उचलण्यासाठी प्रयत्न करताना चंदन गुजर ने पुन्हा गाडी परतवून अंगावर घातली यात सदर दोघेही मृत्यू मुखी पडले आरोपी चंदन ची काकू अनारकली मोहन गुजर 55 या भांडण सोडविण्यासाठी गेल्या मात्र झटापटीत त्यांनाही आरोपीने वाहनाने कुचलले यात त्यांचाही मृत्यू झाला, तीन जण मृत्युंमुखी पडल्याने एकच गोंधळ झाला अंभोरे कुटुंबातील सदस्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करताच आरोपी चे वडील राधेशाम गुजर 65 यांनी कुऱ्हाड फेकून मारल्याने एकास जखमी केले चंदन ची गाडी या धावपळीत खड्ड्यात गेली आणि तो पळून गेला,
हा प्रकार शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांना समजताच आपल्या कार्यकर्त्यांसाह दाखल झाले त्यांनी तातडीने विविध वाहनातून जखमीना उपजिल्हा रुग्णालयात आणले मात्र यातील शामराव अंभोरे 70 अनुसया अंभोरे 67 आणि अनारकली गुजर 55 यांचा मृत्यू झाला, जखमी किशोर अंभोरे, उमेश अंभोरे व शारदा अंभोरे या जखमीना उपचार देऊन अमरावती सामान्य रुग्णालयात पाठविल्यात आले
घटनास्थळी आज पोलीस अधीक्षक यांनी भेट दिली पोलिसांनी पंचनामा केला यांसह लपून बसलेल्या दोन्ही आरोपीना चंदन गुजर व राधेश्याम गुजर यांना ताब्यात घेतले आहे पुढील तपास खल्लार पोलीस करीत आहेत