विशेष

लाटेसह शार्क चं अंड आलं वाहून व्हायरल होतोय व्हिडीओ

Spread the love

                    शार्क ‘ सिर्फ नाम ही काफी है ‘ कारण तो असतोच तितका खतरनाक. या माश्यात प्रचंड शक्ती असते. यात इतकी शक्ती असते की तो बोटही पलटवू शकतो. पण जनतेच्या मनात एक उत्सुकता असते.ते म्हणजे इतर माश्यांप्रमाणे शार्क सुद्धा अंडी घालतो का ? आणि तो अंडी घालतात असेल तर ती कशी असतात.तर आता जनतेची ती उत्सुकता व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओ ने शमली आहे. कारण सोशल मीडियावर आता शार्क ने घातलेल्या अंडी चा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

शार्कही अंडी घालत असून शार्कच्या दुर्मिळ अंड्याचा व्हिडीओ समोर आला आहे.एका तरुणीनं शार्कच्या अंड्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. बीचवर फिरत असताना तिला हे अंड आढळलं. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट तेव्हा घडली जेव्हा या अंड्याच्या आत एक लहान शार्क दिसला. शार्क समुद्रातच अंडी घालते. समुद्राच्या तळाशी असलेल्या या अंड्यांमधून मुले बाहेर पडतात, जी थोड्या वेळाने आईसोबत शिकार करायला लागतात. पण कधी कधी ही अंडी लाटांच्या बरोबरीने किनाऱ्यावर येतात. आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की, शार्क मासा इतका महाकाय आहे, मग त्याचे अंड कसे असते, तर हा व्हिडीओ पाहून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल.

शार्क खूपच वजनदार मासा आहे. मात्र इतकं वजन असून सुद्धा तो हवेमध्ये प्रचंड वेगानं उडी मारू शकतो. शार्क हा समुद्रातील सर्वात मोठ्या माशांपैकी एक आहे. एका शार्कचा सरासरी आकार हा २० ते ४० फूट लांब असतो. तर या माशाचं वजन २८ टन म्हणजे जवळपास ४ हत्तींच्या बरोबर असतं. यावरूनच शार्क किती महाकाय मासा आहे हे आपल्या लक्षात येईल. मात्र लक्षवेधी बाब म्हणजे इतकं वजन असताना सुद्धा तो ६० मैल प्रतितास इतक्या वेगानं पोहू शकतो. अन् शिकार करताना तर तो यापेक्षाही जास्त वेगानं पोहोतो

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close