अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावला
दर्यापूर तालुक्यामध्ये दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या दिवसाच्या पावसाने कापसाची केली नासाडी.
(शेकडो हेक्टरवर झालेला पाऊस त्यामुळे कापूस झाला ओला)
दर्यापूर (तालुका प्रतिनिधी) तालुक्यामध्ये पहिला जो पाऊस आला तो सर्वच पिकांना जवळजवळ पोषक होता त्यामध्ये कापूस तूर हरभरा या सर्वांना पोषक असलेला पाऊस झाला होता मात्र पुन्हा दुसऱ्या दिवशी रात्रीच मुसळधार पाऊस आल्याने प्रत्येक शेतामध्ये मजुराअभावी कापूस वेचायचा राहिला कारण बाहेरचा मजूर आला नसल्याने व मध्यप्रदेश मध्ये निवडणुका असल्याकारणाने मजूर येऊ न शकल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते तथा युवा शेतकरी प्रतिभा साहित्य संघाचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील कावरे यांनी व्यक्त केले व त्यामुळे शेतामध्ये कापूस तसाच राहिल्याने दुसऱ्या दिवसाच्या व तिसऱ्या दिवसाच्या पावसाने कापसाची सर्वत्र नासाडी झाली कुठे कापूस घडून पडला तर कुठे कापूस ओला झाला पाऊस रंग बदलते व त्यामुळे त्याचे नुकसान होऊन भाव कमी भेटतो प्रथमच कापसाचा यावर्षी भाव सात हजार दोनशे रुपये असून त्यातच पाऊस मुसळधार आल्याने पर्यायने शेतकऱ्याचे नुकसानच होत आहे प्रथमच शेतकरी विविध समस्यांनी परेशान होऊन कर्जबाजारी झालेला आहे व त्यातच परतीचा अवकाळी पावसाने पुन्हा शेतकऱ्यालाच मारले आहे व त्यातच दर्यापूर तालुक्यामध्ये पाऊस कमी असल्याचा अहवाल शासकीय स्तरावर देण्यात आल्याची समजते मात्र पाऊस अचानक मोठ्या प्रमाणात आल्याने नुकसान मात्र झाल्या असून शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी यामध्ये कुठलेही राजकारण नसल्याचेही प्रवीण पाटील कावरे यांनी सांगितले आहे कापसाची परिस्थिती अतिशय खराब असून आमच्या प्रतिनिधीने शेतात जाऊन पाहणी केली असता वेगवेगळ्या शेतात वेगवेगळ्या चित्र दिसून आले आहे तेच चित्र आपणासमोर मांडले आहे