विदेशविशेष

मिर्चीने तिला पोहचवले कोमात , सहा महिन्यां पासून घेत आहे उपचार

Spread the love

                 भारतात तिखट मिरची घाटावरची असे म्हटल्या जाते. आपल्या देशात तिखट आणि अतिशय तिखट खाणारे लोक आहेत. पण विदेशात मात्र फार कमी तिखट खाल्ल्या जाते. पण  मिर्ची खाणे तर दूर एका मुलीने फक्त मिर्ची चा वास घेतला आणि तिला रुग्णालयात भरती करावे लागले.

ब्राझीलमध्ये राहणाऱ्या थायस मेडेइरोस नावाच्या तरूणीने एका फार तिखट असलेल्या मिरचीचा वास घेतला. तिच्या आईने सांगितलं की, जेवण बनवण्यात ती मदत करत होती. यादरम्यान तिने तिखट मिरचीचा वास घेतला आणि मिरची नाकाला लावली

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, मिरचीचा वास घेतल्यावर तिच्या मेंदुवर गंभीर सूज आली. या घटनेनंतर ती अनेक दिवस कोमात राहिली. तिला नंतर हॉस्पिटलमधून सोडण्यात आलं होतं. पण नंतर पुन्हा ताप आल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यावेळी तिच्या फुप्फुसात समस्या जाणवत होती. थायसच्या आईने सांगितलं की, आधीच तिला ब्रोंकाइटिस आणि अस्थमासारखे आजार होते.

6 महिन्यांपासून हॉस्पिटलमध्येच…

ही घटना याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात घडली होती. तिला 31 जुलैला डॉक्टरांनी घरी पाठवलं होतं. पण पुन्हा तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तेव्हापासून ती अजूनही हॉस्पिटलमध्येच आहे. डॉक्टरांनी तिला एडिमाची समस्या असल्याचं सांगितलं. ज्यात मेंदुवर सूज येते. सध्या ती ना बोलू शकत ना चालू शकत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close